नेताजी बोस क्रांतिलढ्यातील धगधगते पर्व
By admin | Published: January 24, 2017 12:55 AM2017-01-24T00:55:57+5:302017-01-24T00:55:57+5:30
हसिना फरास : हुतात्मा क्रांती संस्थेतर्फे आयोजित १२० व्या जयंती कार्यक्रमात अभिवादन
कोल्हापूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेना स्थापन करून इंग्रजांना जेरीस आणणारे सुभाषचंद्र बोस हे देशाच्या क्रांतिलढ्यातील एक धगधगते पर्व असल्याचे प्रतिपादन महापौर हसिना फरास यांनी
सोमवारी केले. त्या हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेने आयोजित
केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२० व्या जयंती अभिवादन कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या. मिरजकर तिकटी येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी महापौर फरास व उपमहापौर अर्जुन माने यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पद्माकर कापसे आणि
कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी
यांनी नेताजींच्या आठवणी सांगून त्यांच्या जीवनकार्याचा उजाळा दिला. किसन कल्याणकर यांनीही मत व्यक्त केले.
यावेळी सभागृह नेते प्रवीण केसरकर, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक अजिंक्य
चव्हाण, विजयसिंह खाडे, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, नगरसेविका सुनंदा मोहिते,
अश्विनी बारामते, सूरमंजिरी
लाटकर, माजी स्थायी सभापती आदिल फरास, हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उपाध्यक्ष दुर्वास कदम, जयकुमार शिंदे, फिरोजखान पठाण, अनिल
कोळेकर, राहुल चौधरी, शितल नलवडे, मुसा शेख, अशोक पोवार, श्रीकांत भोसले, संभाजीराव जगदाळे, बाबा सावंत, शिवाजी ढवण, बापू साळोखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. रामेश्र्वर पतकी यांनी आभार मानले.