नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य पे्ररणादायी : सूरमंजिरी लाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 05:54 PM2020-01-23T17:54:03+5:302020-01-23T17:55:05+5:30
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक सुवर्णपान आहे. त्यांचे योगदान आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील, असे ...
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक सुवर्णपान आहे. त्यांचे योगदान आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी गुरुवारी केले.
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त मिरजकर तिकटी येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की यांनी नेताजींच्या कार्याची माहिती दिली. ‘अमर रहे, अमर रहे, सुभाषबाबू अमर रहे’ अशा घोषणांनी उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे, आर. डी. पाटील, संभाजीराव जगदाळे, सतीश पोवार, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, अजित सासने, रमेश मोरे, शिवाजी ढवण, दिलीपकुमार जाधव, संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर, मधुकर रामाणे, पद्माकर कापसे, आदी उपस्थित होते.