‘आयजीएम’मध्ये नवी १५७ पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:34 AM2017-08-03T00:34:55+5:302017-08-03T00:34:55+5:30

New 157 posts in 'IGM' | ‘आयजीएम’मध्ये नवी १५७ पदे

‘आयजीएम’मध्ये नवी १५७ पदे

Next
ठळक मुद्देपदनिर्मिती करण्यास मंजुरी देण्याचा शासन निर्णय


लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटल शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करून तेथे २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास आणि दवाखान्याकडे १५७ अधिकारी व कर्मचाºयांची पदनिर्मिती करण्यास मंजुरी देण्याचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला. आता हे हॉस्पिटल इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय म्हणून ओळखले जाईल, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी बुधवारी दिली.
येथील नगरपालिकेचे असलेले आयजीएम हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याचा निर्णय २१ जून २०१६ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, नव्याने निर्माण होणाºया शासनाच्या या दवाखान्याकडे पदनिर्मिती व आर्थिक तरतूद होण्याची कार्यवाही रखडली होती. आरोग्य विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ ला दवाखान्याचा ताबा घेऊन बाह्यरुग्ण विभाग सुरू केला होता; पण दवाखान्याकडे पदनिर्मिती व आर्थिक तरतूद झाली नसल्याने दवाखान्याकडील अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन रखडले होते. रुग्णालयाकडील कर्मचाºयांनी काम बंद आंदोलनही केले.
दरम्यान, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे आयजीएमबाबत बैठक झाली होती. बैठकीमध्ये दवाखान्याकडील पदनिर्मितीचा प्रस्ताव व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाप्रमाणे बुधवारी शासन निर्णय झाला. त्यामुळे कर्मचाºयांचे थकीत वेतन समस्या मार्गी लागली आहे. यासंदर्भात आमदार हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव सुमित मलिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रयत्न केले होते.
आमदार हाळवणकर यांच्या प्रयत्नांना यश आले. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाकडे आता २०० खाटांचा दवाखाना होणार आहे. टप्प्याटप्प्याने होणाºया या दवाखान्याकडे पहिल्या टप्प्यात स्त्री रोग, प्रसूती, बालरोग, अस्थिशल्य, तंत्र असे विभाग व सर्वसाधारण विभागात रुग्णसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती सांगून आमदार हाळवणकर म्हणाले, दवाखान्याकडे एकूण असणाºया २४१ अधिकारी-कर्मचाºयांच्या पदांपैकी पहिल्या टप्प्यात १५७ अधिकारी-कर्मचाºयांच्या पदांना शासनाने मान्यता दिली आहे. सध्या आयजीएम दवाखान्याकडे असलेले ५३ अधिकारी-कर्मचाºयांचे समावेशन करून घेणार आहे. आरोग्य विभागामार्फत उर्वरित १०२ पदे भरण्यात येतील व बाह्य यंत्रणेतून दोन पदे निवडण्यात येतील. दवाखान्याकडे असलेल्या ५३ अधिकारी-कर्मचाºयांना १ एप्रिल २०१७ पासून मान्यता देण्यात आली आहे.
तीन अभिवचनांपैकी दोन्हींची पूर्तता
इचलकरंजी शहरासाठी आयजीएम दवाखान्याचे शासनाकडे हस्तांतरण, वारणा नळ योजना व यंत्रमागासाठी सवलतीच्या दरात वीज असे अभिवचन देण्यात आले होते. त्यापैकी आयजीएम दवाखान्याचे शासनाकडे हस्तांतरण करण्याचा झालेला निर्णय आता पूर्णत्वास जात आहे. वारणा नळ योजना मार्गी लागली आहे, तर यंत्रमागासाठी सवलतीच्या दरात वीज यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. त्यामुळे माझ्याकडून देण्यात आलेली तिन्ही अभिवचने लवकरच पूर्ण होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: New 157 posts in 'IGM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.