नवे ३२ कोरोना रूग्ण, एक मत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 08:21 PM2021-03-11T20:21:09+5:302021-03-11T20:22:19+5:30
CoronaVirus Kolhapur- गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३२ रुग्ण आढळले आहेत. तर कसबा बावडा येथील ५५ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे १३ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३२ रुग्ण आढळले आहेत. तर कसबा बावडा येथील ५५ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे १३ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
गडहिंग्लज तालुक्यात दोन, हातकणंगले तालुक्यात दोन, करवीर तालुक्यात दोन, नगरपालिका क्षेत्रात सहा आणि इतर जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेले सहा असे रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत.
दिवसभरात २६० जणांची तपासणी करण्यात आली असून, ७२४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ६८ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून, २९६ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. दिवसभरामध्ये ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.