युवा महोत्सवमध्ये ‘न्यू’ व ‘विवेकानंद’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:47+5:302021-07-17T04:19:47+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व न्यू कॉलेज यांच्या वतीने ४० व्या युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने संपन्न ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व न्यू कॉलेज यांच्या वतीने ४० व्या युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. यामध्ये १९ प्रकारांच्या कलांसाठी स्पर्धा घेण्यात आली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ४५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
यामध्ये न्यू कॉलेज व विवेकानंद कॉलेजने प्रत्येकी आठ पारितोषिके पटकावली. कॉमर्स कॉलेज यांनी सहा तर केआयटी काॅलेज व दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी यांनी पाच पारितोषिके पटकावली.
विजेते असे -
रांगोळी : महेश मगदूम, ओंकार शिरगुप्पे, प्रेरणा कवठेकर. मराठी वक्तृत्व : स्वरदा फडणीस, जान्हवी परुळेकर, ऋतुजा देसाई. हिंदी वक्तृत्व : रुबिया मुल्ला, श्रुती सुतार, आरजू शेख. शास्त्रीय गायन : सानिका फडके, शीतल पोतदार, कैवल्य पाटील. शास्त्रीय नृत्य : ऋतिका निने, सार्थक भिलारी, मनाली संकपाळ. व्यंगचित्र : अतुल कापडे, प्रिया कांबळे, शुभम कांबळे. शास्त्रीय सूरवाद्य : ओमकार सुतार, मयूरेश शिखरे, ऋतुराज धूपकर. भिंत्तीचित्र : केवल यादव, प्रतिभा दुंगडे, तृप्ती पटेल. एकपात्री अभिनय : सौरभ करडे, स्वरदा फडणीस, आकाश पाटील. सुगमगायन : प्रतीक्षा पोवार, शीतल पोतदार, कैवल्य पाटील. पाश्चिमात्य वाद्यवादन : ऋषिकेश गुरव, मयूरेश शिखरे, ओमकार सुतार. कातरकाम : केवल यादव, सूचिता तारळेकर, विवेक कांबळे. मेहंदी : प्रणोती पाटील, निराली मामनिया, ऋचिता बोरा. मातीकाम : कौस्तुभ शिरसाट रोहित घोलप, नागराज सुतार. पाश्चिमात्य एकल गायन : ओमकार पाटील, प्रतीक्षा पोवार. नकला : निहाल रुकडीकर, प्रकाश कोळी, सुजित भोसले. स्थळचित्र : गुरुनाथ म्हातुगडे, शुभम कांबळे, विवेक कांबळे.