जनस्वास्थ्य अभियानाने नवी सुरुवात

By admin | Published: December 30, 2014 11:58 PM2014-12-30T23:58:14+5:302014-12-31T00:09:59+5:30

जनजागृती : जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा उपक्रम

A New Beginning With Public Health Campaign | जनस्वास्थ्य अभियानाने नवी सुरुवात

जनस्वास्थ्य अभियानाने नवी सुरुवात

Next

कोल्हापूर : व्यसनविरोधी आणि पर्यावरण प्रदूषणाच्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून त्यांच्यामार्फत समाज व जनजागृती करण्यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्यावतीने ‘जनस्वास्थ्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने दि. १ ते ७ जानेवारी दरम्यान हे अभियान राबविले
जाणार आहे, अशी माहिती जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देवलापूरकर म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहोत. या उपक्रमात जिल्ह्यातील ८५० शाळा सहभाग घेतात. या अभियानातून विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव होतेच; पण त्याचसोबत पर्यावरण प्रदूषणाबाबतही त्या जागरूक होतात. या अभियानात विविध उपक्रम आम्ही घेतो. तसेच प्रतिज्ञा, पोस्टर्स स्पर्धा, पथनाट्ये, विविध विषयांवरील व्याख्यानेही होणार आहेत. या अभियानातील आदर्श शाळा, आदर्श शिक्षिका, पोस्टर्स स्पर्धेतील विजेते, व्यसनविरोधी चळवळ राबविणाऱ्या संस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी ओंकार पाटील व पूजा गुरव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आठवडाभराचे अभियान
गुरुवार, दि. १ जानेवारी : जागतिक सायकल दिन असल्याने आरोग्य व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक घेऊन सायकल फेरी.
शुक्रवार, दि. २ जानेवारी : व्यसन, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांवर विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करण्यासाठी मार्गदर्शन.
शनिवारी, दि. ३ जानेवारी : किशोरवयीन लैंगिक समस्यांबाबत मार्गदर्शन
सोमवार, दि. ५ जानेवारी : शाळेमध्ये स्वच्छता अभियान, कचऱ्यापासून खतनिर्मिती, रेनवॉटर हार्वेस्टिंगविषयी माहिती
मंगळवार, दि. ६ जानेवारी : विविध आजारांबाबत दक्षता घेण्यासंबंधी मार्गदर्शन
बुधवार, दि. ७ जानेवारी : दुपारी ४ ते ५ या वेळेत सर्व मुलांची आपापल्या शाळेच्या प्रमुख रस्त्यांवर रहदारीला अडथळा न आणता मानवी साखळी व व्यसनविरोधी घोषणा.

Web Title: A New Beginning With Public Health Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.