नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रम निश्चित होणार
By admin | Published: May 13, 2017 04:54 PM2017-05-13T16:54:42+5:302017-05-13T16:54:42+5:30
बृहत आराखड्याचे काम सुरू; पुढील आठवड्यात बैठका
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नवीन महाविद्यालये, विद्याशाखा आणि अभ्याक्रमांची निश्चिती होणार आहे. त्यासाठीच्या सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांच्या कालावधीत स्वीकारावयाच्या प्रस्तावांचा शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याबाबत विद्यापीठाशी संबंधित घटकांची मते व माहिती घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ११ मेपासून बैठका घेण्यात येणार आहेत.
या आराखड्याद्वारे कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांत कोणत्या ठिकाणी नवीन महाविद्यालय, विद्याशाखा आणि अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे, हे निश्चित केले जाणार आहे. त्यादृष्टीने या बैठकीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्था प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील व समाजातील घटकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून त्यांची मते व माहिती घेऊन पुढील कार्यवाही होणार आहे.
ज्या ठिकाणी नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमाचे नियोजन स्थळ सूचवावयाचे आहे. त्यांनी विहित नमुन्यामध्ये माहिती भरून बैठकीच्यावेळी समन्वयक यांच्याकडे सादर करावी. यासाठी समिती नियुक्त केली आहे.
समितीचे सदस्य
कोल्हापूर :
प्राचार्य जे. बी. पाटील (समन्वयक), प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे, डॉ. ए. एम. गुरव, पी. वाय. माने, डॉ. पी. एस. पाटील, शंकरराव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. डी. व्ही. कडोले, प्राचार्य बी. ए. खोत.
सांगली :
प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर (समन्वयक), प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. व्ही. पी. रासम, राजेंद्र आर. डांगे, डॉ. डी. के. मोरे, प्राचार्य डॉ. ए. मुल्ला.
सातारा :
डॉ. आर. व्ही. शेजवळ (समन्वयक), अमित चव्हाण, अमित कुलकर्णी, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. पी. डी. राऊत, प्राचार्य सी. जे. खिलारे.
येथे होणार बैठक
कोल्हापूर (कमला कॉलेज कोल्हापूर ) : २२ मे (सकाळी ११ वाजता)
सांगली (विलिंग्डन कॉलेज) : २३ मे (सकाळी ११ वाजता)
सातारा (लाला बहादूूर शास्त्री कॉलेज) : ११ जुलै (सकाळी ११ वाजता)
नमुना माहिती अर्ज....
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नमुना माहिती अर्ज बीसीयूडी या लिंकवर उपलब्ध आहे.