न्यू कॉलेजच्या ‘ए प्लस’ मानांकनामुळे संस्थेची मान उंचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:07+5:302021-04-06T04:24:07+5:30
कोल्हापूर : न्यू कॉलेजच्या ‘ए प्लस’ मानांकनामुळे संस्थेची मान उंचावली आहे. या मानांकनाच्या माध्यमातून गुणवत्तेवर राष्ट्रीय मोहर उमटवली ...
कोल्हापूर : न्यू कॉलेजच्या ‘ए प्लस’ मानांकनामुळे संस्थेची मान उंचावली आहे. या मानांकनाच्या माध्यमातून गुणवत्तेवर राष्ट्रीय मोहर उमटवली आहे, असे प्रतिपादन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेचे अध्यक्ष के. जी. पाटील यांनी येथे केले.
या संस्थेच्या वतीने न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख आणि नॅक समन्वयक डॉ. नीलेश पवार यांचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कॉलेजमधील सर्व घटकांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे सर्वोच्च मानांकन मिळाले असल्याचे संचालक वैभव नायकवडी यांनी सांगितले. या मानांकनासाठी सर्व घटकांनी जिद्दीने मेहनत करून कॉलेजची गुणवत्ता राष्ट्रीय पातळीवर सिद्ध केली असल्याचे प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, संचालक पी. सी. पाटील, पी. के. पाटील, संचालिका सई खराडे, सविता पाटील आदी उपस्थित होते. संचालक विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. शेख यांनी आभार मानले.
चौकट
एक लाखाची देणगी
कॉलेज सन २०२०-२०२१ मध्ये सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी म्हणून कॉलेजला एक लाख रुपयांची देणगी देत असल्याचे सांगत या देणगीचा धनादेश वैभव नायकवडी यांनी प्राचार्य डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
फोटो (०५०४२०२१-कोल-न्यू कॉलेज) : कोल्हापुरातील न्यू कॉलेजला ए-प्लस मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांचा सत्कार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील यांनी केला. यावेळी शेजारी एन. व्ही. पवार,ए. एम. शेख, डी. जी. किल्लेदार, वैभव नायकवडी, विनय पाटील, पी. के. पाटील उपस्थित होते.
===Photopath===
050421\05kol_4_05042021_5.jpg
===Caption===
फोटो (०५०४२०२१-कोल-न्यू कॉलेज) : कोल्हापुरातील न्यू कॉलेजला ए-प्लस मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांचा सत्कार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील यांनी केला. यावेळी शेजारी एन. व्ही. पवार,ए. एम. शेख, डी. जी. किल्लेदार, वैभव नायकवडी, विनय पाटील, पी. के. पाटील उपस्थित होते.