नवे कोरोना रुग्ण पावणेचारशेच्या वर, ९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:27+5:302021-04-15T04:24:27+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३८८ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, ही गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३८८ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, ही गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये १५४ जण बरे होऊन घरी गेले असून, सध्या २,७४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचेच हे निदर्शक आहे.
नव्या आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १५९ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत, तर २६ रुग्ण हे नगरपालिका क्षेत्रातील आहेत. दिवसभरामध्ये ७९९ जणांची तपासणी करण्यात आली असून, १,९१३ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ३५१ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. गुढीपाडव्यामुळे मंगळवारी स्वॅब देण्यास जाणाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी झाली होती. ती पुन्हा बुधवारी वाढली आहे.
चौकट
आजरा ०८
भुदरगड ०४
चंदगड ०३
गडहिंग्लज २९
गगनबावडा ००
हातकणंगले २८
कागल १०
करवीर ३२
पन्हाळा २५
राधानगरी १२
शाहूवाडी ०५
शिरोळ २८
नगरपालिका २६
कोल्हापूर महापालिका १५९
अन्य जिल्हे १९
एकूण ३८८