नवीन औद्योगिक धोरण कोल्हापूरला फायद्याचे: सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:13 AM2019-04-13T01:13:09+5:302019-04-13T01:13:14+5:30

कोल्हापूर : देशातील उद्योगांच्या पुढील वीस वर्षांतील गरजा लक्षात घेऊन नवीन औद्योगिक तसेच नीती धोरण तयार करण्यात आले असून, ...

New industrial policy is beneficial to Kolhapur: Suresh Prabhu | नवीन औद्योगिक धोरण कोल्हापूरला फायद्याचे: सुरेश प्रभू

नवीन औद्योगिक धोरण कोल्हापूरला फायद्याचे: सुरेश प्रभू

googlenewsNext

कोल्हापूर : देशातील उद्योगांच्या पुढील वीस वर्षांतील गरजा लक्षात घेऊन नवीन औद्योगिक तसेच नीती धोरण तयार करण्यात आले असून, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल. या धोरणाचा फायदा कोल्हापूर जिल्ह्णाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तेव्हा जिल्ह्णाच्या औद्योगिक विकासाचा दूरदृष्टी विकास आराखडा तयार करावा; आपण त्यास मदत करू, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी रात्री येथे बोलताना दिली.
येथील ‘नेशन फर्स्ट’ या संस्थेच्या वतीने महासैनिक दरबारच्या हिरवळीवर आयोजित केलेल्या ‘कोल्हापूर बिझनेस कॉन्क्लेव्ह’या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
उद्योजकांची निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे, औद्योगिक कॉरिडॉर निर्माण करणे, ग्लोबल सप्लाय जोडणे, औद्योगिक विकासाला चालना देणे, आदी मुद्दे डोळ्यांसमोर ठेवून नवीन औद्योगिक तसेच नीती धोरण ठरविले आहे. त्याचे दृश्य परिणाम आपणाला पाहायला मिळतील. त्यातून नोकऱ्या निर्माण होतील. या धोरणाचा कोल्हापूरला जास्त फायदा होऊ शकतो; कारण कोल्हापूर जिल्ह्णात उद्योजकता आहे, उद्यमशीलता आहे आणि सरकारच्या मदतीशिवाय काहीतरी नवीन करण्याची मानसिकता येथे आहे. त्यामुळे सर्व प्रकारची मदत करण्यास आपण तयार आहोत, असे प्रभू यांनी सांगितले.
राज्यातील उद्योजकांच्या दृष्टीने राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. कोल्हापूरच्या उद्योजकांच्या समस्या सोडविण्याकरिता जून महिन्यात मुंबईत बैठक आयोजित केली जाईल. उद्योजकांसह एकत्र बसून राज्य सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. प्रा. संजय मंडलिक तसेच ‘नेशन फर्स्ट’चे चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापुरातील उद्योजकांना भेडसावणाºया समस्यांचा ऊहापोह केला.
कोल्हापूरची
किमया अफाट
कोल्हापूरचे आणि माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. असाच मी एकदा येथे आलो आणि दिल्ली येथून प्रधानमंत्री कार्यालयातून फोन आला. ताबडतोब दिल्लीला या असा निरोप मला मिळाला. कोल्हापुरातूनच दिल्लीत गेलो. तेथे पंतप्रधानांनी मला सांगितले की, तुम्हाला मंत्री व्हायचं आहे. त्यातून मला जाणवलं की, इथली किमया अफाट आहे.

Web Title: New industrial policy is beneficial to Kolhapur: Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.