नवविवाहितेची आत्महत्या; पती, सासºयाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:38 AM2017-08-18T00:38:31+5:302017-08-18T00:38:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिराजवळ राहणाºया नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. मोहिनी प्रथमेश लाटणे (वय २५) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ही माहिती समजताच शहरातच राहणाºया मोहिनी हिच्या नातेवाइकांनी लाटणे यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच पती प्रथमेश व सासरे सीताराम रामचंद्र लाटणे या दोघांना मारहाण केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत गावभाग पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसºया वर्षात शिकणारी मोहिनी (मूळ रा. बंडगर माळ, इचलकरंजी) हिचा ६ जून २०१७ रोजी प्रथमेश याच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांतच मोहिनी हिने आत्महत्या केली.
गुरुवारी सकाळी प्रथमेश याला कामावरून सोडून ती घरी परतली होती. त्यानंतर घरातील एका खोलीतील तुळईला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ ती बाहेर येत नसल्याने घरातील नातेवाइकांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तिने गळफास लावून घेतल्याचे दिसले.
शेजाºयांच्या मदतीने तिला सोडवून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती मृत झाली असल्याचे सांगितले. ही माहिती मोहिनी हिच्या बंडगर माळ येथील नातेवाइकांना समजताच त्यांनी लाटणे यांच्या घरात गर्दी केली. तेथे साहित्याची तोडफोड करीत पती प्रथमेश, सासरे सीताराम, सासू मालन यांना मारहाण केली. यामध्ये पती व सासरे जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मध्यस्थी करीत पोलीस बंदोबस्त तैनात केला.
ंसासरच्या छळामुळेच आत्महत्या : नातेवाइकांचा आरोप
लग्नापूर्वी मोहिनीचे उर्वरित शिक्षण पूर्ण करणार असल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले होते; पण तिला शिकू दिले गेले नाही. तसेच वेळोवेळी उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळेच मोहिने हिने आत्महत्या केली, असा आरोप मोहिनीच्या नातेवाइकांनी केला. याबाबत गावभाग पोलिसांत तक्रार नोंद करण्याचे काम सुरू होते. मोहिनीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असल्याने ती मामाकडे राहात होती. तिच्या अशा मृत्यूमुळे नातेवाइकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील आयजीएम रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत्यूपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी
मोहिनी हिने आत्महत्यापूर्वी इंग्रजीमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती चिठ्ठी नातेवाइकांच्या ताब्यात असून, यातील मजकूर समजू शकला नाही.