नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:46+5:302021-04-08T04:25:46+5:30

तुरंबे : नवीन शैक्षणिक धोरण सैद्धांतिकदृष्ट्या चांगले असले, तरी व्यावहारिकदृष्ट्या मात्र ते कुचकामी आहे, असे मत शिवाजी विद्यापीठातील ...

New national education policy ineffective | नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कुचकामी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कुचकामी

Next

तुरंबे : नवीन शैक्षणिक धोरण सैद्धांतिकदृष्ट्या चांगले असले, तरी व्यावहारिकदृष्ट्या मात्र ते कुचकामी आहे, असे मत शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. कांबळे यांनी व्यक्त केले. ते प्रोटान (प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या) कोल्हापूर विभागीय ऑनलाईन अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. धनराज वाघमारे होते. कांबळे पुढे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. शैक्षणिक धोरण हे शिक्षणाला विकेंद्रीकरणकडून केंद्रीकरणकडे घेऊन जात आहे. शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ते सर्वदूर पसरवणे हे गरजेचे असते. अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाचे केंद्रीकरण झाल्यास शिक्षण हे खासगी मालकीचे होऊन जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. विवेक धुपदाळे यांनी कामगार कायद्यांवर मार्गदर्शन केले. डॉ. पी. बी. आचार्य यांनी प्रस्थापित कामगार संघटनांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, इतक्या कामगार संघटना, शिक्षक संघटना असूनसुद्धा शिक्षकांचे, कामगारांचे प्रश्न आणि समस्या या वाढतच आहेत. यावेळी डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. अस्मिता प्रधान, माननीय सदाशिव वारे, माननीय श्रीपाल गायकवाड, डॉ. अर्जुन ओहळ, डॉ. उर्मिला पोळ, सतीश गायकवाड, संदेश कदम, राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

Web Title: New national education policy ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.