corona cases in kolhapur : नवे रुग्ण कमी, कोरोनामुक्त जास्त, १४६१ पॉझिटिव्ह, २५६७ डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 11:17 AM2021-06-06T11:17:17+5:302021-06-06T11:21:02+5:30

corona cases in kolhapur :  कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र शनिवारी स्पष्ट झाले. नवे १४६१ रुग्ण आढळले असून, २५६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

New patients less, corona-free more, 1461 positive, 2567 discharges, 32 deaths | corona cases in kolhapur : नवे रुग्ण कमी, कोरोनामुक्त जास्त, १४६१ पॉझिटिव्ह, २५६७ डिस्चार्ज

corona cases in kolhapur : नवे रुग्ण कमी, कोरोनामुक्त जास्त, १४६१ पॉझिटिव्ह, २५६७ डिस्चार्ज

googlenewsNext
ठळक मुद्देनवे रुग्ण कमी, कोरोनामुक्त जास्त१४६१ पॉझिटिव्ह, २५६७ डिस्चार्ज, ३२ मृत्यू

 कोल्हापूरजिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र शनिवारी स्पष्ट झाले. नवे १४६१ रुग्ण आढळले असून, २५६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्याचे चित्र गेले दोन दिवस दिसत असून, मृतांचा आकडाही कमी होत आहे. गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांपेक्षा ११०६ जादा नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. कोल्हापूर शहरात ३२२, करवीर तालुक्यात २६६, तर हातकणंगले तालुक्यात २३२ नवे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील मृतांची संख्या वाढली असून, ती ११ झाली आहे. हातकणंगले तालुक्यात पाच, तर इचलकरंजीतील चौघांचा मृत्यू झाला आहे.


शहरातील मृतांचा आकडा वाढला

  • कोल्हापूर ११

यादवनगर, जुना बुधवार पेठ, शिवाजी पेठ, फुलेवाडी, मंगळवार पेठ २, राजारामपुरी, नवा वाशीनाका, राजकपूर पुतळा, कसबा बावडा, नागाळा पार्क

  • हातकणंगले ०५

रुई, हुपरी, चंदूर, रुकडी, सावर्डे

  • इचलकरंजी ०४

लालानगर, शहापूर, मलाबादेनगर, इंदिरा कॉलनी

  • शाहूवाडी ०२

सुपात्रे, खोतवाडी

  • गडहिंग्लज ०२

हसूरचंपू, गडहिंग्लज

  • करवीर ०२

प्रयाग चिखली, कळंबा

  • पन्हाळा ०१

आळवे

  • शिरोळ ०१

अब्दुललाट

  • कागल ०१

बेनिक्रे

  • इतर ०३

आष्टा, कणकवली, देवगड

Web Title: New patients less, corona-free more, 1461 positive, 2567 discharges, 32 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.