फराळ पार्टीतून ‘सलोख्याचा नवा पूल’
By admin | Published: October 30, 2016 01:14 AM2016-10-30T01:14:41+5:302016-10-30T01:18:56+5:30
दिवाळी फराळ : मुस्लिम व सर्व समाजबांधवांसाठी सकल मराठा समाजाचे आयोजन
कोल्हापूर : मराठा मोर्चाला केवळ पाठिंबा न देता त्यात सक्रिय सहभाग घेऊन मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधीलकी जपली. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दिवाळीनिमित्त मंगळवार पेठ येथील दैवज्ञ समाज बोर्डिंग येथे शनिवारी सायंकाळी फराळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून समाजात एकोपा निर्माण करणारा ‘सलोख्याचा नवा पूल’ बांधण्यात आला.
संयोजक वसंत मुळीक म्हणाले, मराठा समाजाचा मोर्चा हा बहुजन समाजाचा मोर्चा ठरला. या मोर्चात मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सर्व जातिधर्मांचा आमच्यासोबत सक्रिय सहभाग राहिला. त्यामुळे कोल्हापूरचा मोर्चा संस्मरणीय ठरला. त्यातून देशाला एक नवी दिशा मिळाली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी स्वागत केले.
यावेळी महापौर अश्विनी रामाणे, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, पोलिस उपअधीक्षक सतीश माने (गृह), शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, निरीक्षक अनिल देशमुख, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, प्रशासक कादरभाई मलबारी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे, विजया पाटील, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, मल्हार सेनेचे बबन रानगे, माजी नगरसेवक आदिल फरास, नंदकुमार मोरे, दिलीप भुर्के, अजित राऊत, अजित खराडे, केमिस्टस असोसिएशनचे मदन पाटील, प्रकाश मेडशिंगे, स्वा. शे. संघटना जिल्हाध्यक्ष भगवान काटे, के. एम. बागवान, सुधाकर पेडणेकर, डॉ. संदीप पाटील, बाबा महाडिक, छावा संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत, डॉ. गिरीश कोरे, राजू वाली, हर्षल सुर्वे, खाटीक समाजाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, बंटी सावंत, अवधूत पाटील, महादेव पाटील, पद्माकर कापसे, किशोर घाटगे, संजय क्षीरसागर, अशोक माळी, पापाभाई बागवान, बाबासाहेब तिबिले, प्रदीप व्हरांबळे, शंकरराव शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यानिमित्त वसंत मुळीक यांनी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांना फराळ भरविला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, कादरभाई मलबारी, राजू सावंत, अजित खराडे, आदी उपस्थित होते.