जुन्या पासपोर्टसाठी नवी नियमावली

By Admin | Published: December 28, 2014 12:23 AM2014-12-28T00:23:32+5:302014-12-28T00:23:45+5:30

तत्काळ संपर्काचे आवाहन : हस्तलिखितासह कमी पानांचा पासपोर्ट मिळणार बदलून

New rules for old passports | जुन्या पासपोर्टसाठी नवी नियमावली

जुन्या पासपोर्टसाठी नवी नियमावली

googlenewsNext

संतोष पाटील ल्ल कोल्हापूर
हस्तलिखित स्वरूपातील पासपोर्ट, नूतनीकरणासाठी सहा महिन्यांचा कालावधी बाकी असलेल्या तसेच कमी व्हिसा पेजेस शिल्लक असलेल्या पासपोर्टधारकांनी पासपोर्ट कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अध्यादेशाद्वारे केले आहे. २३ डिसेंबरला जारी केलेल्या या अध्यादेशानुसार पासपोर्टधारकांना सोप्या अन् अत्यंत जलद पद्धतीने पासपोर्टचे नूतनीकरण करून दिले जाणार आहे. ‘पासपोर्ट इंडिया’ या संकेतस्थळावर किंवा १८००२५८१८०० या राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकावर
संपर्क साधावा, असे यामध्ये म्हटले आहे.
जागतिक नागरी उड्डयण संस्थेने घालून दिलेल्या नव्या नियमानुसार कोल्हापुरातील दहा हजार, तर देशभरातील सहा कोटी पासपोर्टधारकांपैकी तब्बल २ कोटी ८६ लाख पासपोर्टधारकांना २४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत पासपोर्टचे नूतनीकरण करणे बंधनकारक
राहणार आहे.
मशीन रिडेबल पासपोर्ट (एमआरपी) देण्याची पद्धती २००१ पासून सुरू झाली. यापूर्वी दिलेले पासपोर्ट, खासकरून ९०च्या मध्यापूर्वी दिलेले सर्व पासपोर्ट हे नॉन-एमआरपीमध्ये मोडतात. नव्या अध्यादेशानुसार हे पासपोर्ट नूतनीकरणास पात्र आहेत. चिकटविलेला फोटो असलेल्या पासपोर्टना या नव्या पद्धतीने नूतनीकरण करावे लागणार आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत अशा पद्धतीने नूतनीकरण न केलेल्या पासपोर्टधारकांना जगभरातील इतर देशांत कोणत्याही कारणास्तव व्हिसा मिळणार नाही. नवीन जागतिक निकष व नियमावलीनुसार नऊ वर्षे पूर्ण झालेला कोणताही पासपोर्ट हा नूतनीकरणास पात्र आहे.
अनेक देशांत दोनपेक्षा कमी पाने शिल्लक असलेला पासपोर्ट गृहीत धरला जात नाही. कमी पाने शिल्लक असलेल्या पासपोर्टसाठी अतिरिक्त पासपोर्ट देण्याची प्रथा नाही. त्यामुळे अशा पासपोर्टधारकांनी नवीन ६४ पाने असलेला पासपोर्ट घेणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी पासपोर्टधारकांनी नवी दिल्लीतील पतियाळा हाऊस, पुण्यातील
टिळक मार्ग येथील भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, सीपीव्ही विभागाशी टोल फ्री किंवा ई-मेलद्वारे
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीन वर्षांत कोल्हापूरकरांच्या परदेशवारीत दुपटीने वाढ
पासपोर्टची संख्या
सन संख्या
२००९ ६९२५
२०१० ९१२७
२०११ ११२१२
१०१२ ११२६५
२०१३ १४०२६
२०१४ १६३२२
(२० डिसेंबरअखेर)
देश व पर्यटकांची टक्केवारी
युरोप- १० %४ इंग्लंड- ७ %
दुबई- ८ %४ अमेरिका- ६ %
कॅनडा- २ %४ चीन- ५ %
सौदी अरेबिया- २ %
श्रीलंका- २ %
थायलंड-मलेशिया सिंगापूर - ५९ %
परदेशवारीची कारणे
पर्यटन - ७० %४ इतर कारणे- ४ %
व्यवसाय- १५ %४ नोकरी - १० %
हॉस्पिटल - दीड ते दोन टक्के

Web Title: New rules for old passports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.