आजऱ्यात नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:42+5:302021-02-24T04:25:42+5:30
संभाजी सरदेसाई यांनी प्रास्ताविक केले. सुंदर गाव स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविल्याबद्दल वेळवट्टी, आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल देऊळवाडीच्या सरपंच नंदाताई पोतनीस, ...
संभाजी सरदेसाई यांनी प्रास्ताविक केले. सुंदर गाव स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविल्याबद्दल वेळवट्टी, आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल देऊळवाडीच्या सरपंच नंदाताई पोतनीस, लाकूडवाडीचे सरपंच शंकर कुराडे यांचा सत्कार करण्यात आला. २६ ग्रामपंचायतींचे नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
महिला सरपंचांनी स्वत:ची सही आपल्या पती किंवा मुलांना शिकवू नये. आपण ग्रामपंचायतीचा कारभार समजावून घेऊन सही करावी, असे आवाहन प्रा. पी. डी. पाटील यांनी केले.
सरपंच, उपसरपंच यांचे मानधन तुटपुंजे असून ते वाढविण्यासाठी संघटना पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मारुती मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमात आजरा अर्बन बँकेच्या संचालकपदी व मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मारुती मोरे, मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बंडोपंत चव्हाण, महिला तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रचना होलम यांचा सत्कार केला.
राजाराम पोतनीस, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष काशिनाथ तेली, आजरा तालुका कार्याध्यक्ष संतोष बेलवाडे, दीपक देसाई, अमोल बांबरे, सुनील देसाई, महिला तालुकाध्यक्ष वृषाली कोंडुस्कर, लता रेडेकर, वैशाली गुरव उपस्थित होते. अॅड. लक्ष्मण गुडूळकर यांनी स्वागत केले. शंकर कुराडे यांनी आभार मानले.
------------------------------
* फोटो ओळी : सरपंच परिषदेच्यावतीने नूतन सरपंचांचा सत्कार करताना काशिनाथ तेली. पी. डी. पाटील, शिवाजी मोरे, राजू पोतनीस, वृषाली कोंडुस्कर आदी उपस्थित होते.
क्रमांक : २३०२२०२१-गड-०२