नुतन मंत्र्यांचे कोल्हापुरात ग्रॅण्ड वेलकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:28 PM2020-01-03T16:28:35+5:302020-01-03T16:29:47+5:30
कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील व राजेंद्र पाटील या राज्यमंत्र्याचे कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे ग्रॅण्ड वेलकम झाले. हलगी, संबळ, धनगरी ढोलांच्या निनादात कागदी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या दणदणाटातच या तीन मंत्र्यांनी कोल्हापुरकरांच्या स्वागताचा स्विकार झाला. फुलांनी सजवलेल्या ओपन टप ट्रकमधून कावळा नाका ते दसरा चौक या मार्गावर निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी केलेल्या जंगी स्वागतानेही मंत्रीही भारावले.
कोल्हापूर: कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील व राजेंद्र पाटील या राज्यमंत्र्याचे कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे ग्रॅण्ड वेलकम झाले. हलगी, संबळ, धनगरी ढोलांच्या निनादात कागदी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या दणदणाटातच या तीन मंत्र्यांनी कोल्हापुरकरांच्या स्वागताचा स्विकार झाला. फुलांनी सजवलेल्या ओपन टप ट्रकमधून कावळा नाका ते दसरा चौक या मार्गावर निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी केलेल्या जंगी स्वागतानेही मंत्रीही भारावले.
मंत्री झाल्यानंतर शुक्रवारी हे तिघेही कोल्हापुरात पहिल्यांदाच आले. साहजिकच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. कावळा नाका येथे अकरा वाजता या तीनही मंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी उचलूनच फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये बसवले. पुढे मागे कार्यकर्त्याचा जथ्था, गाड्यांचा ताफा आणि त्याच्या मधोमध सजवलेली दोन वाहने असा ताफा कावळा नाक्यापासून दसरा चौकाकडे मार्गस्थ झाला. पहिल्या गाडीत नुतन मंत्री, खासदार संजय मंडलीक, महापौर सुरमंजिरी लाटकर, आमदार ऋतूराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, नुतन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतिश पाटील, आर.के.पोवार, ए.वाय.पाटील, संजय डी.पाटील, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, नविद मुश्रीफ, आदिल फरास यांच्यासह वरिष्ठ नेते होते तर त्यांच्या मागील गाडीत प्रतिमा सतेज पाटील यांच्यासह महिला नेत्या होत्या.
कावळा नाका येथे ताराराणी पुतळा, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील राजीव गांधी पुतळा, व्हीनस कॉर्नरला राजाराम महाराज पुतळा असे अभिवादन केल्यानंतर दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीची सांगता झाली. येथे सभा झाल्यानंतर या तीनही मंत्र्यांनी बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर व महात्मा फुले यांचा पुतळा व शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मंदीरात जाऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
----------------------------------------------------------------------
(नसिम)