पत्रकांच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:33+5:302020-12-24T04:23:33+5:30
कोल्हापूर : भोसलेवाडी येथील समता विद्या मंदिरच्या सहायक शिक्षिका अर्चना बाबासाहेब कुरणे यांना कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक ...
कोल्हापूर : भोसलेवाडी येथील समता विद्या मंदिरच्या सहायक शिक्षिका अर्चना बाबासाहेब कुरणे यांना कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने ‘हिरकणी’ पुरस्काराने सन्मानित शनिवारी करण्यात आले. शालेय शिक्षण क्षेत्रासह गरीब विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना कोल्हापूर जिल्हा सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव सुंदरराव देसाई, प्रभारी मुख्याध्यापिका सुमन पाटील, मुख्याध्यापक शशिकांत सावंत, सहायक शिक्षक सुजय देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२३१२२०२०-कोल-अर्चना कुरणे (पुरस्कार)
विवेकानंद कॉलेजच्या नियतकालिकास पुरस्कार
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजने प्रकाशित केलेल्या ‘विवेक’ या वार्षिक नियतकालिकास मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय नियतकालिक स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा भाषा विशेषांक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेतही ‘विवेक’ने सलग पाच वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या नियतकालिकामध्ये ज्युनिअर व सीनिअर विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी लिहिलेल्या कथा, कविता, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण व माहितीपर लेखन आणि विविध छायाचित्रे आहेत. या पुरस्काराबद्दल संपादकीय मंडळ, लेखन केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले.