पत्रकांच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:55+5:302020-12-28T04:13:55+5:30
कोल्हापूर : एम.फिल., पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठ ...
कोल्हापूर : एम.फिल., पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठ परिसरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून हवी आहे. त्यांना मागणीनुसार ती व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे अधिविभागप्रमुख, संचालक, समन्वयक, पदव्युत्तर अधिविभागाच्या माध्यमातून अर्ज करावेत, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले.
‘सॅप’कडून वर्धापनदिनानिमित्त उद्यापासून लसीकरण
कोल्हापूर : येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (सॅप) या संस्थेतर्फे पाळीव प्राण्यांचा दवाखाना चालविण्यात येतो. या दवाखान्याच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार (दि. २९) आणि बुधवारी (दि. ३०) रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि जंतनिर्मूलन शिबिर होणार आहे. राजारामपुरी पाचवी गल्ली येथील पेटस क्लिनिक येथे सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत हे शिबिर होईल. त्याचा कोल्हापुरातील प्राणीप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा.
‘सीएचबी’धारकांची आज निर्दशने
कोल्हापूर : तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या (सीएचबी) विविध मागण्यांसाठी युनिव्हर्सिटी स्टुडंटस् असोसिएशनच्यावतीने (युएसए) आज, सोमवारी दुपारी बारा वाजता दसरा चौक येथे निदर्शने केली जाणार आहेत.