दुसऱ्या दिवशी मुंबई-कोल्हापूरसाठी ३० जणांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:18 AM2020-10-29T11:18:42+5:302020-10-29T11:20:23+5:30
Airport, mumbai, kolhapur मुंबई-कोल्हापूर मार्गावरील विमान सेवेचा दुसऱ्या दिवशी बुधवारी ३० प्रवाशांनी लाभ घेतला. त्यात मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. मुंबईहून बुधवारी कोल्हापूरला १७ प्रवासी आले.
कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर मार्गावरील विमान सेवेचा दुसऱ्या दिवशी बुधवारी ३० प्रवाशांनी लाभ घेतला. त्यात मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. मुंबईहून बुधवारी कोल्हापूरला १७ प्रवासी आले.
कोल्हापूरहून मुंबईला १३ प्रवासी गेले. नियोजित वेळेत विमान आले. मुंबई-कोल्हापूर, हैदराबाद-कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवर दिवसभरात २८८ जणांनी प्रवास केला. कोरोनाच्या सद्य:स्भितीत कोल्हापूरची ही प्रवासी संख्या चांगली आहे. या संख्येमध्ये वाढ होईल, असे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी बुधवारी सांगितले.