दुसऱ्या दिवशीही विद्यापीठावर शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:22+5:302021-04-02T04:25:22+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘ए-प्लस प्लस’ मानांकन बुधवारी मिळाले. त्याबद्दल विविध घटकांनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी कुलगुरू डॉ. डी. ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘ए-प्लस प्लस’ मानांकन बुधवारी मिळाले. त्याबद्दल विविध घटकांनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, आदींनी प्रत्यक्ष भेटून कुलगुरू डॉ. शिर्के यांना शुभेच्छा दिल्या. ‘नॅक’च्या प्रक्रियेत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी, निवृत्त अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांतील सदस्य, आदींनी प्रत्यक्ष भेटून, तर अनेकांनी दूरध्वनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मान्यवर आणि नागरिकांनी दूरध्वनी, ई-मेलद्वारे अभिनंदन करावे. प्रत्यक्ष भेटूनच अभिनंदन करण्याची जोखीम टाळावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी केले आहे.