दुसऱ्या दिवशीही परराज्यातील मजूर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:38 PM2021-04-16T19:38:56+5:302021-04-16T19:40:50+5:30
CoronaVirus Kolahpur : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या संचारबंदीमुळे रोजगार नसल्याने कोल्हापूरमधील परराज्यांतील मजूर, कामगार आपल्या गावांना जात आहे. सुमारे १२०० जण गुरूवारी ह्यकोल्हापूर-धनबादह्ण रेल्वेने गेले. कोल्हापूर-गोंदिया या महाराष्ट्र एक्सप्रेसने शुक्रवारी सुमारे तीनशे मजूर रवाना झाले.
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या संचारबंदीमुळे रोजगार नसल्याने कोल्हापूरमधील परराज्यांतील मजूर, कामगार आपल्या गावांना जात आहे. सुमारे १२०० जण गुरूवारी ह्यकोल्हापूर-धनबादह्ण रेल्वेने गेले. कोल्हापूर-गोंदिया या महाराष्ट्र एक्सप्रेसने शुक्रवारी सुमारे तीनशे मजूर रवाना झाले.
संचारबंदी लागू असल्याने उद्योग,बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. रोजगार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी वाढेल या भीतीने उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल येथून आलेले कामगार आपआपल्या गावांना जात आहेत.
महाराष्ट्र एक्सप्रेस ही शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून निघाली. त्यातून परराज्यांतील सुमारे तीनशे मजूर रवाना झाले. या रेल्वेतून जाण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून हे कामगार रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. कोल्हापूरमधून दर गुरूवारी रात्री कोल्हापूर-धनबाद रेल्वे रवाना होते. त्याव्दारे गया (बिहार) पर्यंत झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमधील हे मजूर जातात. आता कोल्हापुरातील उर्वरीत परराज्यातील काही मजूरांनी पुढील आठवड्यातील कोल्हापूर-धनबाद रेल्वेने जाण्याची तयारी केली आहे. कुटुंबासहीत असलेले काही मजूरांनी मात्र, कोल्हापूरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे.