थुंकीमुक्त कोल्हापूरचे आता पुढचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:56+5:302021-02-05T07:14:56+5:30

कोल्हापूर : थुंकीमुक्त आणि निरोगी कोल्हापूरसाठी सुरू केलेले थुंकीमुक्त अभियानाने आता पुढचे पाऊल टाकण्याचे ठरवले आहे. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचे ...

The next step of spit-free Kolhapur | थुंकीमुक्त कोल्हापूरचे आता पुढचे पाऊल

थुंकीमुक्त कोल्हापूरचे आता पुढचे पाऊल

Next

कोल्हापूर : थुंकीमुक्त आणि निरोगी कोल्हापूरसाठी सुरू केलेले थुंकीमुक्त अभियानाने आता पुढचे पाऊल टाकण्याचे ठरवले आहे. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज रविवारी प्रबोधन रॅली निघणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहापासून दुपारी चार वाजता सुरू होणारी ही रॅली मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड अशा मार्गावरून फिरून पापाची तिकटी संपणार आहे.

कोल्हापुरात सुरू असलेली ॲन्टिस्पिटिंग मूव्हमेंट आता निर्णायक वळणार आहे. आशादायी बदलही घडू लागले आहेत. म्हणून निवांत बसून राहण्यापेक्षा यात सातत्य राहावे यासाठी महात्मा गांधीजींना आदरांजली म्हणून आज कोल्हापुरात रॅली निघत आहे. लाल टोप्या परिधान करत घोषणा देत ही रॅली थुंकीबहाद्दरांना आवाहन करणार आहे.

या मोहिमेला कोल्हापूरकरांनी मागील काही महिन्यांत भरभरून प्रतिसाद दिला आहे. दंडात्मक कारवाई होत असल्याने तोंड बाहेर काढून पिचकारी मारणारेही आता क्षणभर विचार करताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण अजून दिसत असले तरी हळूहळू का असेना पण बदल घडत आहे. कारवाई आणि प्रबोधन या दोन्ही माध्यमातून ही चळवळ पुढे जात असल्याने तिला जनाधारही मिळू लागला आहे. शिवाय थुंकणे हे आरोग्यास हानिकारक असल्याची जाणीवही वाढीस लागली आहे.

Web Title: The next step of spit-free Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.