Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 04:50 PM2024-06-26T16:50:57+5:302024-06-26T16:55:57+5:30

''शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख काही मंडळींनी हेतूपुरस्सर निर्माण केली याची खंत''

Next year Shahu Jayanti will come with the MLA gulal says Samarjit Ghatge | Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल

Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल

गौरव सांगावकर

राधानगरी: सालाबादप्रमाणे पुढच्यावर्षी ही राधानगरीमध्ये शाहू जयंतीसाठी येणार आहे. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार. मात्र हा गुलाल तमाम जनतेच्या त्यागाचा समर्पणाचा कष्टाचा असेल. यामध्ये कागलकरांच्या बरोबरीने राधानगरीकरांचेही योगदान असेल. हा गुलाल केवळ माझ्या विजयाचा नसेल तर तमाम जनतेच्या विजयाचा  असेल असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केले. ते राधानगरी धर्मस्थळ येथे शाहू जयंती उत्सवात बोलत होते. 

घाटगे म्हणाले, शाहूंच्या "कागल"ची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख गेल्या पंचवीस वर्षांपासून काही मंडळींनी हेतूपुरस्सर निर्माण केली आहे. याची खंत आम्हाला आहे. येत्या काळात राजर्षी "शाहूं" ची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची देशभर ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे घाटगे यांनी यावेळी सांगितले. 

राधानगरी धरणस्थळ हे आमच्यासाठी ऊर्जास्थळ आणि  प्रेरणास्थळ आहे. पाच वर्षांपुर्वी आम्ही शाहू जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करत आहोत. या ठिकाणचे पर्यटन वाढावे व या पर्यटनाच्या माध्यमातून शाहूंच्या कर्मभूमीची ओळख सर्वदूर व्हावी हाच येथे जयंती साजरी करण्यामागे आमची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात आपण स्थानिक भुमिपुत्र आणि शाहू महाराजांचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी प्राधान्य देणार आहोत.

यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजे बँकेचे चेअरमन एम.पी .पाटील, राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले, बिद्रीचे माजी व्हा. चेअरमन बाबासाहेब पाटील, भगवानराव काटे, दत्तामामा खराडे, कारखान्याचे सर्व संचालक, शाहू ग्रुपचे पदाधिकारी, कागल राधानगरी येथील शाहू प्रेमी, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक संभाजी आरडे यांनी केले तर आभार विलास रणदिवे यांनी मानले.

Web Title: Next year Shahu Jayanti will come with the MLA gulal says Samarjit Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.