उसाच्या ट्रॉलीला धडकून निढोरीचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:06+5:302021-02-08T04:22:06+5:30

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निढोरी-कागल रस्त्याने बजाज प्लॅटिना दुचाकीवरून नागेश रघुनाथ सुतार (रा. निढोरी, ता. कागल) आणि त्याचे नातलग ...

Nidhori youth killed after hitting sugarcane trolley | उसाच्या ट्रॉलीला धडकून निढोरीचा युवक ठार

उसाच्या ट्रॉलीला धडकून निढोरीचा युवक ठार

Next

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निढोरी-कागल रस्त्याने बजाज प्लॅटिना दुचाकीवरून नागेश रघुनाथ सुतार (रा. निढोरी, ता. कागल) आणि त्याचे नातलग सचिन गोविंद सुतार (रा. कडवे, ता. शाहूवाडी) हे दोघे कागलच्या दिशेने रात्री आठच्या सुमारास निघाले होते. पिंपळगाव बुद्रुकजवळ दामू म्हांगोरे यांच्या शेतासमोर शाहू कारखान्याला ऊस पुरविण्यासाठी जाणारी उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली थांबली होती. या ट्रॉलीला दुचाकीची जोरात धडक बसल्याने नागेश सुतार रस्त्यावर आपटला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. गंभीर जखमी अवस्थेतील नागेशला कोल्हापुरात खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची वर्दी नामदेव पांडुरंग सूर्यवंशी (रा. पिंपळगाव बुद्रुक) यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलते, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

हेल्मेट असते तर...

मोठ्याने टेप लावून उसाने भरलेल्या अवजड ट्रॉल्या नेताना ट्रॅक्टरचालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसामध्ये परिसरात तीन मोठे अपघात झाले. शनिवारी बिद्रीजवळ ट्रॉलीला धडकून एकाचा बळी गेला; तर पाच-सहा दिवसांपूर्वी आदमापूरजवळ एस.टी.ला ट्रॉली धडकून कॉलेज युवती गंभीररीत्या जखमी झाली. उभारलेल्या ट्रॉलीला धडकून निढोरीचा युवक रविवारी मृत झाला. या तिघांनीही हेल्मेट परिधान केलेनव्हते. मृत दोघांनीही हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता.

Web Title: Nidhori youth killed after hitting sugarcane trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.