शहरात रात्रनिवाऱ्यांचीच ससेहोलपट...स्वयंसेवी संस्थांना साहाय्याची आवश्यकता;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:06 AM2018-04-08T01:06:00+5:302018-04-08T01:06:00+5:30

Nightly people in the city ... need for NGOs; | शहरात रात्रनिवाऱ्यांचीच ससेहोलपट...स्वयंसेवी संस्थांना साहाय्याची आवश्यकता;

शहरात रात्रनिवाऱ्यांचीच ससेहोलपट...स्वयंसेवी संस्थांना साहाय्याची आवश्यकता;

Next
ठळक मुद्देमहिलांचे प्रमाण जास्त : आर्थिक विवंचनेमुळे सेवा प्रभावित

इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : मनोरुग्ण, कौटुंबिक छळाने त्रस्त तसेच वयोवृद्ध महिला यांच्यासह ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा फिरस्त्यांसाठी विशेषत: महिलांसाठी सुरू असलेली रात्रनिवारे चालवायची कशी, हा प्रश्न ‘एकटी’सारख्या स्वयंसेवी संस्थेपुढे निर्माण झाला आहे. अशा संस्थांना केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने अर्थसाहाय्य केले जात नसल्याने दानशूरांच्या सहकार्यावर हे सुरू आहे.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात फिरस्ते राहतात. बेघरांसाठी महापालिकेने चार रात्रनिवारे दिले आहेत. ‘एकटी’साठी अडीच वर्षांपूर्वी रिलायन्स मॉलमागे रात्र निवारा केंद्र सुरू झाले. तसेट संस्थेला जेम्स स्टोन इमारतीतही जागा दिली आहे. हे दोन्ही रात्रनिवारे महिलांसाठी चालविले जातात. सध्या येथे १९ महिला असून पुरुषांसाठीही शिरोली जकात नाका व शाहू नाका येथे रात्रनिवाºयासाठी जागा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २०१५मधील निकालपत्रानुसार ५० हजार लोकसंख्येमागे बेघरांसाठी एक रात्रनिवारा हवा. अर्बन लायबलीहूड मिशन योजनेअंतर्गत या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे. मनपाने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या करारानुसार दहा टक्के रक्कम संस्थेला देण्यात येणार आहे; पण अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

संस्थेच्या वतीने आठवड्यातून तीन दिवस मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठांचा सर्व्हे केला जातो. दुकानांबाहेर, रस्त्यावर झोपलेल्या, फिरत असलेल्या महिलांना संस्थेत आणले जाते. महिन्याकाठी जवळपास २० जण दाखल होतात. त्यांची मानसिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्यांचा अहवाल बनवून त्यांचा प्रवेश निश्चित केला जातो. दुर्धर आजार झालेल्या वयोवृद्ध तसेच मनोरुग्ण महिलांचा सांभाळ करणे जिकिरीचे असते. डॉ. मंजुळा पिशवीकर या उपचार, तर समुपदेशक डॉ. कावेरी चौगुले या मनोरुग्णांसाठी काम करतात. अशाच तज्ज्ञ, दानशूरांच्या सहकार्याची संस्थेला गरज आहे.

४२ महिलांचे पुनर्वसन
वर्षांत संस्थेत ८५ महिलांची सोय करण्यात आली. त्यातील ४२ जणींचे पुनर्वसन झाले आहे. त्यात कौटुंबिक छळ झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांचे समुपदेशन, मानसिक स्वास्थ्य सुधारणे, बरे होऊ न शकणाºया मनोरुग्णांची नगरमधील ‘माउली’ संस्थेत रवानगी, अशा गोष्टींचा समावेश आहे.

रात्रनिवारे कोणत्याही अनुदानाशिवाय चालविले जातात. आम्हाला मोठी अडचण असते ती अन्नधान्याची. एवढ्या व्यक्तींचा सांभाळ करायचा म्हणजे खर्चही तितकाच जास्त. दानशूर व्यक्तींनी सहकार्यासाठी पुढे यावे. - अनुराधा भोसले, ‘एकटी’ संस्था

 

Web Title: Nightly people in the city ... need for NGOs;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.