साहित्यातून निकोप समाज घडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:21+5:302021-04-05T04:22:21+5:30

पेरणोली : ललित लेखन तहान भूक विसरायला लावते. लेखक हा कलावंत असतो. साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असून नव्या ...

Nikop society should be formed from literature | साहित्यातून निकोप समाज घडावा

साहित्यातून निकोप समाज घडावा

Next

पेरणोली :

ललित लेखन तहान भूक विसरायला लावते. लेखक हा कलावंत असतो. साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असून नव्या लेखकांनी साहित्यातून निकोप समाज घडवावा, असे मत लेखक प्रा. सुभाष कोरे यांनी व्यक्त केले.

आजरा येथे लेखिका अश्विनी व्हरकट-सावंत यांच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले होते.

कोरे म्हणाले, अलिकडे वाचन वाढत आहे. त्यामुळे वास्तवातील समस्या मांडल्या पाहिजे. साहित्य मनोरंजनासाठी नसून समाज जागृतीसाठी परखड लिहावे

कॉ. संपत देसाई म्हणाले, लेखक बाळ सावंत यांचा वारसा अश्विनी यांनी जपला आहे. पुस्तकात ग्रामीण भागातील अंतरंगाचा व महिलांच्या मनातील स्पंदनांचा उलगडा केला आहे.

लेखिका अश्विनी व्हरकट-सावंत यांनी पुस्तकाची भूमिका मांडली. यावेळी जि.प. सदस्य जीवन पाटील, पांडुरंग लोंढे, शुभांगी निकम, डॉ. सागर वांद्रे, संतराम केसरकर, सुनीता खाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सरपंच उषा जाधव, उपसरपंच उत्तम देसाई, के.व्ही. पाटील, आनंदराव व्हरकट, संकेत सावंत, जयवंत चोरगे, सचिन सावंत, रवींद्र खैरे, नीलेश घाटगे, शैलेश मुळीक आदी उपस्थित होते. दयानंद भंडारे यांनी सूत्रंसचालन केले. अमर सावंत यांनी आभार मानले.

--------------------------

* फोटो ओळी : आजरा येथे आठवणीच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन करताना सुभाष कोरे, लेखिका अश्विनी व्हरकट-सावंत, सरपंच उषा जाधव, कॉ. संपत देसाई, उपप्राचार्य राजीव टोपले, जीवन पाटील, पांडुरंग लोंढे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०४०४२०२१-गड-०८

Web Title: Nikop society should be formed from literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.