स्विमींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सहसचिवपदी नीलेश मिसाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:51+5:302021-04-08T04:24:51+5:30
नूतन कार्यकारिणी २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी निवडण्यात आली. कार्यकारिणीतील पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष: दीपक मेजर(मुंबई), उपाध्यक्ष : मयूर व्यास(मुंबई),जुबेन ...
नूतन कार्यकारिणी २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी निवडण्यात आली. कार्यकारिणीतील पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष: दीपक मेजर(मुंबई), उपाध्यक्ष : मयूर व्यास(मुंबई),जुबेन अमेरिया (सोलापूर), डाॅ. जयप्रकाश दुबळे(नागपूर), राजू कोळी (रायगड), संतोष पाटील (मुंबई), सचिव : नीता तळवीकर (पुणे), संभाजी भोसले (नागपूर), राजेंद्र निबालते (नाशिक), कोषाध्यक्ष : किशोर शेट्टी (मुंबई) , सदस्य: अभय देशमुख (औरंगाबाद), महेंद्र कपूर (चंद्रपूर), डाॅ. महादेव सेजुल (परभणी), नितीन डफले (वर्धा), आदित्य क्षीरसागर (सिंधुदुर्ग) धनंजय वानखेडे (वाशिम) राजेश्वर खंगार (बुलडाणा), प्रवीण श्रीराम (सोलापूर) यांचा समावेश आहे.
‘पीएफ’ ची उद्या पेन्शन अदालत
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूरतर्फे उद्या, शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १.०० वा. या दरम्यान ताराबाई पार्कातील कार्यालयात ‘पेन्शन अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. तरी निवृत्ती वेतनासंदर्भात निवृत्ती वेतनधारक व सभासद यांच्या काही तक्रारी वा अडचणी असतील तर त्या उपस्थित राहून तक्रार अर्जाद्वारे सादर कराव्यात. त्या तक्रारींचे त्वरित निवारण करणे शक्य होईल. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक भविष्य निधी आयुक्त, पेन्शन एस.एस.बर्नवाल यांनी केले आहे.