नीलेवाडीकरांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:10+5:302021-07-24T04:17:10+5:30
नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील नीलेवाडीला महापुराने विळखा घातला आहे.शुक्रवारी रात्रीपर्यंत सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर झाले. अद्याप शंभरभर ...
नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील नीलेवाडीला महापुराने विळखा घातला आहे.शुक्रवारी रात्रीपर्यंत सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर झाले. अद्याप शंभरभर लोक महापुरात अडकले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या साध्या दोन बोटीमधून नागरिक बाहेर काढण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. वाढत्या महापुराने त्या बोटी भरकटू लागल्यामुळे आज रात्री नागरिकांना बाहेर काढण्याचे काम बंद करण्यात आले. आमदार राजूबाबा आवळे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती दिली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून एनडीआरएफची टीम आल्यानंतरच या लोकांना बाहेर काढणे शक्य होणार आहे. गावातील घाटगेमळा, शिवाजी पुतळा परिसर व मोहिते गल्लीच्या उंचवट्याच्या ठिकाणी हे लोक गटागटाने मदतीची प्रतीक्षा करत बसले आहेत. शेतकऱ्यांची जनावरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. शेवटी जनावरांची दावी कापून त्यांना जड अंतकरणाने शेतकऱ्यांनी मुक्त केले आहे. त्यांचे पशुधन आता नशिबाच्या हवाली केले आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
२३ निलेवाडी पूर