निम्या कोल्हापुरचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार
By admin | Published: March 19, 2017 03:02 PM2017-03-19T15:02:38+5:302017-03-19T15:02:38+5:30
काही भागात कमी दाबाने पाणी : चंबूखडी येथे व्हॉल्व दुरुस्तीचे काम
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ :चंबुखडी येथील मुख्य वितरण नलिकेवरील व्हॉल्व्ह झापट दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने सोमवारी दिवसभर निम्म्या शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. उंच भागात पाणीपुरवठा पूर्ण बंद तर सखल भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी महापालिकेचे ८ टँकरद्वारे मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. चंबुखडी येथील ७५० मि.मी. व्यासाच्याशहरात मुख्य नलिकेवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्तीचे काम सोमवारी सकाळपासून हाती घेण्यात येणार आहे. यामुळे दोन उपसापंपऐवजी एकाच उपसा पंपाद्वारे पाणीपुरवठा याच नलिकेतून करण्यात येणार आहे, त्यामुळे तो कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे शहरातील सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबाने होणार आहे. या सर्व भागांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील आठ टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरीकांनी उपलब्ध असणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. (प्रतिनिधी) या भागावर होणार परिणाम उपनगरातील ए वॉर्डमधील फुलेवाडी, आपटेनगर, रिंगरोड परिसर, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा रोड, शिवाजी पेठ, राजकपूर पुतळा परिसर, हरिओम नगर, अंबाई टँक, आझाद चौक, टेंबेरोड, सबजेल परिसर, महालक्ष्मी मंदिर, आदी परिसरात अपुरा व अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.