चोरट्याकडे मिळाल्या नऊ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:16+5:302021-09-02T04:52:16+5:30

( सुधारित) लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगाव पोलिसांनी जबरी चोरी, मोटारसायकल, जनावरे चोरणाऱ्या दोन टोळ्यांकडून वडगावातील सहा, ...

Nine bikes found by the thief | चोरट्याकडे मिळाल्या नऊ दुचाकी

चोरट्याकडे मिळाल्या नऊ दुचाकी

Next

( सुधारित)

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : वडगाव पोलिसांनी जबरी चोरी, मोटारसायकल, जनावरे चोरणाऱ्या दोन टोळ्यांकडून वडगावातील सहा, इस्लामपूर येथील एक अशा सात चोऱ्या उघडकीस आणल्या. त्यांच्याकडून २ लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्वरुप रमेश पाटील (वय २४ रा. सुतार गल्ली, घुणकी), ओंकार प्रशांत देशमुख (वय २० रा. मूळ विश्राम बाग, सांगली, सध्या रा. गांधी मेडिकल जवळ, नवेपारगाव ता. हातकणंगले) तर अन्य दुसऱ्या टोळीतील तुषार रमेश साठे, (वय २८ रा. शेख रोड, ), मनोहर साठे, (वय ३७, रा. साखरवाडी,दोघे रा. कोडोली), नागेश शामराव सूर्यवंशी (वय २७ रा. मनपाडळे ), रहिम दस्तगीर दरवेशी (वय २५ रा.पाडळी, सध्या भुये) ,फयाज मकबूल मकानदार (वय २६ रा. राऊत कॉलनी), मुदतसर गौस जमादार (वय २८ रा. भादोले रोड , वडगाव), नागेश राजाराम बोने (वय २४ रा. पारगाव) अशा सात साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही टोळीकडून नऊ मोटारसायकल, दोन म्हैशी, तीन शेळ्या, दोन बोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नजीर खान, अर्चना पाटील, हवालदार रवींद्र गायकवाड, पोलीस नाईक जावेद रोटीवाले, रामराव पाटील, दादा माने, योगेश राक्षे, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण, विकी भंडारे, सतीश सुतार यांचे पथकाने चोऱ्या उघडकीस आणल्या.

३१ वडगाव पोलीस

फोटो कॅप्शन : पेठवडगाव : वडगाव पोलिसांनी जप्त करण्यात केलेल्या मोटारसायकली समवेत पोलीस पथक (छाया : क्षितिज जाधव )

Web Title: Nine bikes found by the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.