'दुष्काळग्रस्त मुलींना नऊ महिन्यांचा पास, कपडे, बूट देणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 07:21 AM2019-06-11T07:21:41+5:302019-06-11T07:22:25+5:30

येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये उर्वरित कर्जमाफीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता

Nine months pass, clothes, boots to drought girls | 'दुष्काळग्रस्त मुलींना नऊ महिन्यांचा पास, कपडे, बूट देणार'

'दुष्काळग्रस्त मुलींना नऊ महिन्यांचा पास, कपडे, बूट देणार'

Next

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळग्रस्त १० तालुक्यांतील ५० हजार मुलींना नऊ महिन्यांचा पास, गणवेशासाठी कापड आणि बूट देणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. वाढदिवसाचे औचित्य साधून पाटील यांनी ही घोषणा केली.
मंत्री पाटील यांनी दुष्काळग्रस्त मुलींच्या शिक्षणासाठी, कपडे आणि बूट, चप्पल यांसाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळपर्यंत २० लाख रुपये संकलित झाले आहेत. आणखी तीन दिवस पाटील यांचे स्वीय सहायक राहुल चिकोडे यांच्या जरगनगर येथील कार्यालयामध्ये निधी संकलन करण्यात येणार आहे.

अधिवेशनात उर्वरित कर्जमाफी
येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये उर्वरित कर्जमाफीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ज्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, अशांना ती देता येईल का, याबाबत आकडेमोड सुरू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Nine months pass, clothes, boots to drought girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.