कोविड नियमांचे उल्लघंन, पोलीस कामात अडथळाप्रकरणी हालेवाडीच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:50+5:302021-08-23T04:27:50+5:30
हालेवाडी, ता. आजरा. येथे भैरीदेव मंदिरात कोविड नियमांचे उल्लंघन व पोलीस कामात अडथळा आणल्याप्रकरणी गावातील नऊ जणांवर आजरा पोलिसांत ...
हालेवाडी, ता. आजरा. येथे भैरीदेव मंदिरात कोविड नियमांचे उल्लंघन व पोलीस कामात अडथळा आणल्याप्रकरणी गावातील नऊ जणांवर आजरा पोलिसांत रणजित एकनाथ जाधव पोलीस कॉन्स्टेबल आजरा पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, भैरीदेव मंदिर परिसरात एकत्र जमाव करून गायरान जमीन गट. नं ४३८ मध्ये मंदिराचे बेकायदेशीर धार्मिक स्थळाचे बांधकाम चालू असले ठिकाणी गावातील मानसिंग खोराटे यांनी लोकांना बेकायदेशीर कृत्य करणेसाठी चिथावणी देऊन सर्व लोकांना एकत्र एक जमाव केला. कोविड नियमांचे उल्लंघन करून देवीच्या नावानं घोषणा देऊन पोलिसांशी हुज्जत घालणे, आम्ही सर्वजण आत्मदहन करतो, असे मोठ्याने गोंधळ करून पोलीस कामात विनाकारण अडथळा निर्माण केला म्हणून मानसिंग खोराटे, संजय सुरेश पाटील, अरुण पाथरवट, सुरेश पाटील, बाबुराव पाटील, शंकर आजगेकर, रवींद्र खोराटे, संग्राम आपके, सर्जेराव आपके यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस. कोचरगी करीत आहेत.