दुहेरी खून प्रकरणी कोल्हापुरातील नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:51 PM2021-03-06T13:51:07+5:302021-03-06T13:52:45+5:30
Court Kolhapur- टेबलाईवाडी रेल्वे उड्डाण पूल परिसरात पाठलाग करून तलवार, कोयता, चाकूने दोघा तरुणांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कोल्हापूर : टेबलाईवाडी रेल्वे उड्डाण पूल परिसरात पाठलाग करून तलवार, कोयता, चाकूने दोघा तरुणांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जयदीप उर्फ हणामा राजू चव्हाण, साहिल उर्फ घायल लक्ष्मण कावळे, रियाज उर्फ काल्या सदरू देसाई, विशाल सागर गिरी, फारुक अहमद शेख, सद्दामहुसेन नजीर देसाई, इम्रान राजू मुजावर, धनाजी वसंतराव मिसाळ, रोहित सुधीर कांबळे (सर्व रा. टेंबलाईवडी व विक्रम नगर परिसर) अशी आरोपिंची नावे आहेत. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील एम बी पाटील यांनी काम पाहिले. तब्बल सात वर्षांनी हा निकाल लागला, या खटल्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.
टेंबलाईवाडी उड्डाणपूल व कोयास्को चौक येथे नितीन महादेव शिंदे आणि समीर सिराज खाटीक यांचा दि २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाठलाग करून निर्घुन खून केला होता. सरकार तर्फे अँड. एम. बी. पाटील यांनी 3४ साक्षीदार तपासले.