मतदार राजा संतप्त; माझे नाव यादीतून काढा; नऊ हजारांवर मतदारांचे अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 12:03 PM2021-12-07T12:03:51+5:302021-12-07T12:15:10+5:30

सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम सुरू आहे

Nine thousand 877 people applied to the election administration to remove their names from the voter list in kolhapur | मतदार राजा संतप्त; माझे नाव यादीतून काढा; नऊ हजारांवर मतदारांचे अर्ज !

मतदार राजा संतप्त; माझे नाव यादीतून काढा; नऊ हजारांवर मतदारांचे अर्ज !

Next

कोल्हापूर : सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम सुरू आहे. यामध्ये नऊ हजार ८७७ जणांनी मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. यावर निर्णय होऊन ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

एक महिन्यापासून मतदार यादी अद्ययावत केली जात आहे. हे काम तालुका पातळीवर तहसील आणि जिल्हा पातळीवर जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे केले जात आहे. यामध्ये नव्याने मतदार नोंदणीसाठी तब्बल ४१ हजार ४४० अर्ज दाखल झाले आहेत. त्याचीही छाननी केली जात आहे.

- नवीन नोंदणीसाठी अर्ज - ४१,४४०
- नाव वगळण्यासाठी अर्ज - ९८७७
- दुरुस्तीसाठी अर्ज - २८४४
- स्थलांतराबाबत अर्ज - १५७१


विधानसभा मतदारसंघ

चंदगड २४८५
राधानगरी ३८२०
कागल ५९१७
कोल्हापूर दक्षिण ४८३१
करवीर ६१००
कोल्हापूर उत्तर २४५०
शाहूवाडी ५८७५
हातकणंगले ४२८४
इचलकरंजी ३११०
शिरोळ २५६८

Web Title: Nine thousand 877 people applied to the election administration to remove their names from the voter list in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.