कोल्हापुरातील नऊ हजार ईव्हीएम मशीन उत्तर प्रदेशला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:47+5:302021-09-24T04:28:47+5:30
कोल्हापूर : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातून गुरुवारी नऊ हजार ४०२ ईव्हीएम मशीन रवाना झाले. निवडणूक विभागाकडून राजाराम ...
कोल्हापूर : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातून गुरुवारी नऊ हजार ४०२ ईव्हीएम मशीन रवाना झाले. निवडणूक विभागाकडून राजाराम तलाव येथील शासकीय गोदामातून पोलीस बंदोबस्तात हे मशीन पाठविण्यात आले.
उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तेथील पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापुरातून ईव्हीएम मशीन पाठविण्यात आले. फारुखाबादसाठी ३ हजार बॅटेल युनिट, पिलभितसाठी १ हजार ४० बॅलेट युनिट, ५६० कंट्रोल युनिट व ६१० व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले. मुझफ्ऱ्फरनगरसाठी १ हजार बॅलेट, ८४० कंट्रोल व ९९० व्हीव्हीपॅट मशीन, बागपतसाठी २२० बॅलेट, २८० कंट्रोल युनिट व १८० व्हीव्हीपॅट मशीन, बदायूंसाठी ३०० कंट्रोल युनिट, मेरठसाठी १९२ कंट्रोल युनिट व १९० व्हीव्हीपॅट मशीन पाठविण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
---
फोटो नं २३०९२०२१-कोल-ईव्हीएम मशीन
ओळ : उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीसाठी गुुरुवारी कोल्हापुरातील राजाराम तलावजवळील शासकीय गोदाम येथून पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन पाठविण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)