नीतेश राणे : वळसंगमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रारंभ,

By admin | Published: February 11, 2017 11:32 PM2017-02-11T23:32:27+5:302017-02-11T23:32:27+5:30

राज्य सरकार विश्वासघातकी भाजप-शिवसेनेवर टीका

Nitesh Rane: Congress campaign started in Vrindavan, | नीतेश राणे : वळसंगमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रारंभ,

नीतेश राणे : वळसंगमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रारंभ,

Next

संख : राज्यातील भाजप-शिवसेना सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये, निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. हे सरकार विश्वासघातकी आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला पैसे नहीत, मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जाहिरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे. या सरकारची आर्थिक कुवत नाही, असा आरोप आ. नीतेश राणे यांनी केला.
वळसंग (ता. जत) येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कॉँग्रेस प्रचार सभेत ते बोलत होते. प्रचाराचा प्रारंभ राणे यांच्याहस्ते करण्यात आला. स्वागत उपसरपंच मनीष चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक उद्योगपती सतीश चव्हाण यांनी केले. सतीश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
आ. राणे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये लोकांना आश्वासने दाखवून मते मिळविली. भोळ्याभाबड्या जनतेने आश्वासनाला बळी पडून परिवर्तन केले; पण अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलेले नाही. आत्महत्यांचे सत्र वाढत चालले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता जाब विचारण्याची गरज आहे. आम्ही विधिमंडळात कर्जमाफी करण्यासाठी मागणी केली. परंतु कर्जमाफी करण्याची आर्थिक क्षमताच त्यांची राहिलेली नाही. राज्यात कोपर्डीसारखी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा, सुव्यवस्था सुरक्षित राहिली आहे काय? असा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली.
सध्याचे सरकार हे नालायक लोकांचे सरकार आहे, असे मी म्हणत नाही, तर सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरेच म्हणतात. शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्यावर भेटायला गेले होते. बाहेर येऊन राजीनाम्याचे पत्र दाखवितात. हा पोरखेळ चालविला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे असते तर तोंडावर राजीनामा फेकला असता. हे सत्तेत चिकटून बसलेले आहेत. कॉँग्रेसला सत्ता द्या. आम्ही मराठा, धनगर, लिंंगायत समाजाला आरक्षण देऊ. तालुक्यातील प्रश्न मार्गी लावू. कॉँग्रेसच्या पाठीमागे उभा राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील, विक्रम सावंत, नाना शिंदे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, माजी जि. प. सदस्य आप्पाराय्या बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगराध्यक्ष इकबाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, पं. स. सदस्य प्रकाश भोसले, साहेबराव टोणे व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते. उमाजीराव सनमडीकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)

चौकशीची मागणी
जत तालुक्यामध्ये एमआरजीएस योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुगांची हवा खायला पाठविले पाहिजे,अशी मागणी यावेळी राणे यांनी केली.

Web Title: Nitesh Rane: Congress campaign started in Vrindavan,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.