शिवसेनेच्या उपनेतेपदी नितीन बानुगडे-पाटील

By admin | Published: January 26, 2015 12:43 AM2015-01-26T00:43:50+5:302015-01-26T00:45:26+5:30

राज्यात सेना वाढविण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी

Nitin Banude-Patil as the saint of Shivsena | शिवसेनेच्या उपनेतेपदी नितीन बानुगडे-पाटील

शिवसेनेच्या उपनेतेपदी नितीन बानुगडे-पाटील

Next

सातारा : शिवसेनेचे सातारा, सांगली जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
प्रा. बानुगडे-पाटील यांनी शिवबंध बांधल्यापासून त्यांच्याकडे सातारा, सांगली जिल्ह्यांचे संपर्क नेतेपद देण्यात आले होते. या काळात त्यांनी सातारा, सांगली जिल्ह्यांतील गावागावांत शिवसेना पोहोचविण्याचे काम केले आहे. याची दखल घेऊन त्यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. बानुगडे-पाटील यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्यभर व्याख्याने दिले आहेत. त्यामुळे राज्यात सेना वाढविण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निवडीचे वृत्त समजताच बानुगडेवाडी, ता. कोरेगाव येथे त्यांचा शिवसेनेचे रणजितसिंह भोसले यांनी सत्कार केला. यावेळी महेश शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nitin Banude-Patil as the saint of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.