सेट परीक्षेत निवास पाटील उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:55+5:302021-04-24T04:22:55+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयातील इंग्रजी व संवाद कौशल्य विषयाचे प्राध्यापक निवास सखाराम पाटील यांना शिवाजी विद्यापीठाकडून इंग्रजी विषयातून पीएच.डी. प्रदान करण्यात ...
अभियांत्रिकी महाविद्यालयातील इंग्रजी व संवाद कौशल्य विषयाचे प्राध्यापक निवास सखाराम पाटील यांना शिवाजी विद्यापीठाकडून इंग्रजी विषयातून पीएच.डी. प्रदान करण्यात आली. वडाचीवाडी (
वाकिघोल, ता. राधानगरी) हे त्यांचे गाव आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘क्लास कॉन्फ्लीक्ट इन हेन्री ग्रीन्स सिलेक्ट नॉव्हेल्स’ असा होता. त्यांना डॉ. घाळी महाविद्यालयाचे डॉ. एन. बी. मासाळ ,केआयटी संचालक डॉ. विलास कार्जीन्नी,
विभागप्रमुख डॉ. डी. जे साठे यांचे मार्गदर्शन लाभले. केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील
कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले यांनी प्रा. पाटील यांचे अभिनंदन केले.
फोटो (२३०४२०२१-कोल-निवास पाटील (सेट एक्झाम)
वीज बिल आंदोलन तात्पुरते स्थगित
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सध्या संचारबंदी लागू आहे. त्यामुळे वीज बिल माफी साठीचे घोषित केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. पुन्हा योग्यवेळी आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी माहिती वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
फायनान्स कंपन्यांच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी
कोल्हापूर : कोरोनामुळे सध्या बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीत चालू होत नाहीत. तोपर्यंत कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबवून मुदतवाढ देण्याबाबत फायनान्स कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले असल्याची माहिती ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिली.
राजीव गांधी वसाहतीत अन्नछत्र
कोल्हापूर : येथील राजीव गांधी वसाहतीमध्ये (मार्केट यार्ड) हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्था संचलित करवीर क्षेत्र गुरूदत्त महाराज देवस्थान अन्नछत्राची स्थापना आणि शाखेचे उदघाटन डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह औंधकर, तर दादासो हेरले, विरेंद्र अतिग्रे प्रमुख उपस्थित होते. डॉ. पाटील, उद्योजक संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कैलास शिंदे, प्रकाश कांबळे, विजय कांबळे, राहुल सोनटक्के, प्रदीप घोडेकर, किसन सावंत, ओंकार साळोखे, तानाजी जाधव, स्वप्नील कांबळे, आदी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत अवघडे यांनी सूत्रसंचालन केले. मारूती कसबे यांनी आभार मानले.