निवेदिता मानेंच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न!

By admin | Published: October 1, 2014 09:45 PM2014-10-01T21:45:36+5:302014-10-02T00:16:30+5:30

बंगल्यातील खिडकीच्या काचेत मुश्रीफ यांचा चेहरा दिसू लागला

Nivedita considers child's suicide attempt! | निवेदिता मानेंच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न!

निवेदिता मानेंच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न!

Next

कोल्हापूर : माने गट संपविण्यासाठी हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांनी कूटनीती केली. यामुळे मला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही याचा राग मला अनावर झाल्यामुळेच आमच्या बंगल्यातील खिडकीच्या काचेत मुश्रीफ यांचा चेहरा दिसू लागला आणि मी माझ्या हाताने ती काच फोडली. यात हाताला गंभीर जखम होऊन ४५ टाके पडलेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता माने यांचे कनिष्ठ चिरंजीव सत्त्वशील यांनी आज, बुधवारी सांगितले.
दोन भावांतील उमेदवारीच्या संघर्षातून सत्त्वशील यांनी काल, मंगळवारी हाताची नस कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी हा खुलासा केला. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून सत्त्वशील माने यांनी हाताची शीर कापून मंगळवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरोळ व इचलकरंजी मतदारसंघांतील धैर्यशील व सत्त्वशील या दोन भावांतील उमेदवारीच्या संघर्षातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत होते.

Web Title: Nivedita considers child's suicide attempt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.