निविदेलाच गेले ५२२ दिवस;सातारा-कागल रस्त्याचे काम : सहापदरीकरणाच्या निविदेची २२ शुद्धिपत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:30 AM2019-05-14T00:30:52+5:302019-05-14T00:30:57+5:30

संतोष पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची ...

Nividal has been 522 days; Satara-Kagal road work: 22 potholes of the six-page order | निविदेलाच गेले ५२२ दिवस;सातारा-कागल रस्त्याचे काम : सहापदरीकरणाच्या निविदेची २२ शुद्धिपत्रके

निविदेलाच गेले ५२२ दिवस;सातारा-कागल रस्त्याचे काम : सहापदरीकरणाच्या निविदेची २२ शुद्धिपत्रके

googlenewsNext

संतोष पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा अंतिम करण्याचे काम गेले ५०६ दिवस सुरू आहे. २२ डिसेंबर २०१७ पासून सुरू असलेली ही प्रक्रिया २९ मे २०१९ ला सकाळी अकरा वाजता संपण्याची आशा आहे. या कालावधीत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचआय) तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक काढून निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली. या ४६.५ किलोमीटर कामाची मुुदत ७३० दिवसांची आहे; परंतु निविदा प्रक्रियाच तब्बल ५२२ दिवस लांबली आहे. परिणामी, ‘डी.एस.आर.’नुसार कामाची किंमत किमान २०० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई-चेन्नई हायवे (एनएच ४८) हा पुणे-सातारा-बंगलोर-चित्तूर आणि चेन्नई, आदी प्रमुख दहा शहरांतून जातो. महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांतून तब्बल १४१९ किलोमीटरचा हायवे आहे. १९९९ साली स्वर्णिम चतुर्भुज योजनेत मुंबई-चेन्नई हायवेचे चौपदरीकरण झाले.
महाराष्टÑातील ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी, चित्तूर, टूमकूर, आदी शहरांतून हा महामार्ग आहे. ५८४६ किलोमीटरच्या स्वर्णिम चतुर्भुज योजनेत ९० टक्के रस्त्यांचे सहापदरीकरण पूर्ण केले आहे. त्यातील मुंबई-पुणे २००० साली जलदगतीने एक्स्प्रेस वे केला गेला. मात्र, त्यानंतर राज्यातील रुंदीकरण कासव छाप ठरले.
एनएचआयच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालात सातारा-कागल या १३३ किलोमीटरच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. १४१९ किलोमीटरच्या रस्त्यातील ६७८.५०० ते ७२५ किलोमीटर दरम्यानचा ४६.५० किलोमीटरचा सातारा-कागल दरम्यानचा टप्पा क्रमांक ३ या रस्त्याचे सहापदरीकरण ठरले. त्यानुसार ‘एनएचआय’ने २२ डिसेंबर २०१७ ला दुपारी ५.४० वाजता १२० दिवस मुदतीची एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. मात्र, ही निविदा आजपर्यंत उघडलीच नाही.
आता २८ मे २०१९ पर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख असून, २९ मे २०१९ ला सकाळी अकरा वाजता निविदा उघडली जाणार आहे. या ५०६ दिवसांच्या काळात ‘एनएचआय’ने तब्बल २२ वेळा शुद्धिपत्रक काढले. २८ फेब्रुवारी २०१९ ला सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी शेवटचे २२ वे शुद्धिपत्रक काढण्यात आले. त्यात पुन्हा बदल करून एका मिनिटाच्या अवधीत पुन्हा ५ वाजून १८ मिनिटांनी रिवाईज केले. आता पुन्हा शुद्धिपत्रक न निघाल्यास सातारा-कागल रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील कामास २९ मे २०१९ ला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.
डीएसआरनुसार २०० कोटींची वाढ
सातारा-कागल सहापदरीकरणातील ४६.५० कि.मी.च्या रस्त्यासाठी एक हजार १७ कोटी ३२ लाख रुपयांची निविदा २२ डिसेंबर २०१७ला प्रसिद्ध झाली. १२० दिवसांची निविदा प्रक्रिया पावणेदोन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबली. जिल्हा दरसूची (डी.एस.आर.) दरवर्षी सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढते. ‘डी.एस.आर.’ वाढीनुसार प्रकल्प खर्च वाढीचे प्रयोजन निविदेच्या अटी, शर्थीत असल्यास मूळ प्रकल्प खर्चात किमान २०० कोटी रुपयांची वाढ होईल.

Web Title: Nividal has been 522 days; Satara-Kagal road work: 22 potholes of the six-page order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.