मनपा निवडणूक २९ आॅक्टोबरला शक्य

By admin | Published: September 20, 2015 01:31 AM2015-09-20T01:31:57+5:302015-09-20T01:31:57+5:30

पालकमंत्र्यांचे सूतोवाच : ऐन गणेशोत्सवात राजकारण तापले; इच्छुकांचे फलक

NMC elections can be held on 29 October | मनपा निवडणूक २९ आॅक्टोबरला शक्य

मनपा निवडणूक २९ आॅक्टोबरला शक्य

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख किती? याबाबत शहरवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच शनिवारी सायंकाळी फुलेवाडी प्रभाग क्र.७२ मध्ये एका कार्यक्रमात निवडणूक २९ आॅक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
महापालिका निवडणुकीच्या वातावरणाने शहरात राजकारण दिवसेंदिवस तापू लागले आहे. प्रत्येक नेत्याने आपल्या सोयीने आघाड्या तयार केल्या आहेत. प्रत्येक पक्ष-आघाड्यांनी प्रभागवार उमेदवार चाचपणी करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. या मुलाखती घेण्यात प्रथम भाजप-ताराराणी महायुतीने बाजी मारली. त्यानंतर इतर पक्षांनीही इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या. गणेशोत्सव मंडळांसमोर उमेदवारांच्या स्वागत कमानीवरही इच्छुकांच्या छबी झळकू लागल्या आहेत. काही आघाड्यांच्या उमेदवारांची पहिली यादीही तयार झाली आहे, फक्त जाहीर करणे बाकी आहे. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी येत्या २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. महापालिका प्रशासनाकडून शनिवारी सायंकाळी प्रभागनिहाय मतदारयाद्या जाहीर झाल्या. त्यावर हरकतींचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे कदाचित २८ अगर २९ सप्टेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार तीस दिवसांनी म्हणजेच दि. २९ आॅक्टोबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फुलेवाडी येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या कार्यक्रमातील जाहीर सभेत महापालिकेची निवडणूक दि. २९ आॅक्टोबर रोजी होण्याची शक्यता व्यासपीठावरून व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी ही शक्यता जाहीरपणे व्यक्त केल्याने त्यावेळी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Web Title: NMC elections can be held on 29 October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.