महापालिका ४८३ व्याधीग्रस्त बालकांची तपासणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:51+5:302021-06-05T04:18:51+5:30

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पुढील टप्पा म्हणून महापालिकेच्यावतीने आज, शनिवारपासून “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” अभियान राबविले जाणार आहे. ...

NMC will check 483 sick children | महापालिका ४८३ व्याधीग्रस्त बालकांची तपासणी करणार

महापालिका ४८३ व्याधीग्रस्त बालकांची तपासणी करणार

Next

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पुढील टप्पा म्हणून महापालिकेच्यावतीने आज, शनिवारपासून “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात १८ वर्षांखालील ४८३ व्याधीग्रस्त बालकांचे सर्वेक्षण करून त्यांची सहा मिनिटे वॉक टेस्ट घेतली जाणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी ३० मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे १८ वर्षांखालील व्याधीग्रस्त बालकांचा सर्व्हे करून कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत निर्देश दिले होते. यासाठी माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शनिवारपासून हे अभियान राबविण्याच्या सूचना नोडल अधिकारी व सर्व वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.

संजीवनी अभियानाचाच एक भाग असलेले “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” हे अभियान आजपासून राबविले जात आहे. महापालिकेने शहरातील ४८३ व्याधीग्रस्त बालकांची यादी तयार केली आहे. या यादीमधील व्याधीग्रस्त बालक असलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण संजीवनी अभियानामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येणार आहे.

व्याधीग्रस्त बालकाच्या कुटुंबातील व्यक्तींची सहा मिनिट वॉक टेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षानुसार कोविड टेस्ट, उपचार व संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. या कुटुंबांच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत स्वतंत्र नोंदी ठेऊन आठवड्यातून एकदा गृहभेट देऊन कोविडबाबत त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व्हेसाठी मुख्याध्यापक व संबंधित शाळेतील शिक्षकांचा सहभाग घेतला जाणार आहे. महापालिकेच्या यादीशिवाय अन्य व्याधीग्रस्त बालक सर्वेक्षणात आढळल्यास त्यांही बालकांचा समावेश केला जाणार आहे.

Web Title: NMC will check 483 sick children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.