शासकीय योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:50+5:302021-09-27T04:25:50+5:30
गांधीनगर : निराधारांचा पेन्शनचा प्रश्न हाती घेऊन तो मार्गी लावल्याने आनंद आणि समाधान वाटते. भविष्यात एकही लाभार्थी शासकीय योजनांपासून ...
गांधीनगर : निराधारांचा पेन्शनचा प्रश्न हाती घेऊन तो मार्गी लावल्याने आनंद आणि समाधान वाटते. भविष्यात एकही लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, असे मत दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. गडमुडशिंगी येथील महादेव मंदिरात संजय गांधी निराधार मंजुरी पत्रांचे वाटप पाटील यांच्याहस्ते केले. यावेळी जि. प. सदस्या वंदना पाटील, करवीर पं. स.चे माजी सभापती प्रदीप झांबरे, पं. स. सदस्या शोभा राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष कांबळे यांच्या प्रयत्नातून मंजूर केलेल्या गडमुडशिंगी, वळीवडे, वसगडे, सांगवडे, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, गांधीनगर या गावांतील ‘संजय गांधी, श्रावण बाळ’ योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या मंजुरी पत्रांचे वाटप आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य बाबासोा माळी, मा.प.स. सचिन पाटील, विजय पाटील, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब पाटील, प्रकाश शिंदे ,ग्रामविकास अधिकारी आर. एन. गाढवे, तलाठी संतोष भिऊंगडे, उत्तम झांबरे, पांडुरंग पाटील, अजित नेर्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ-
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करताना आ. ऋतुराज पाटील, प्रदीप झांबरे, वंदना पाटील, संतोष कांबळे, रावसाहेब पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.