कोते सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर, ९३२ मते ठरावाच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 06:54 PM2020-12-19T18:54:56+5:302020-12-19T18:59:29+5:30

SarpanchKolhapurnews- कोते ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अनिता सचिन पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. नऊ विरुद्ध एक सदस्यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला होता .

No-confidence motion against Kote Sarpanch approved, 932 votes in favor of the resolution | कोते सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर, ९३२ मते ठरावाच्या बाजूने

कोते (ता .राधानगरी) येथे मतदानासाठी झालेली गर्दी. (छाया -श्रीकांत ऱ्हायकर)

Next
ठळक मुद्देकोते सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर, ९३२ मते ठरावाच्या बाजूने नोंदवलेल्या मतापैकी ५९० मध्ये ठरावाच्या विरोधात

धामोड- कोते ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अनिता सचिन पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. नऊ विरुद्ध एक सदस्यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला होता .

आज बोलवलेल्या विशेष गावसभेमध्ये सकाळी आठ ते अकरा पर्यंत नोंदवलेल्या १६१४ मतदानापैकी ठरावाच्या बाजूने ९३२ तर ठरावाच्या विरोधात ५९० अशा फरकाने सरपंच अनिता पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव आज संमत झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. संदिप भंडारे यांनी काम पाहिले.

कोते, गोतेवाडी व मानेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून अनिता पाटील यांची निवड झाली होती. नऊ विरुद्ध एक असे संख्याबळ असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये गेली तीन वर्षे विकासकामांच्या मुद्द्यावरून सतत वाद होत होते.

यातूनच नऊ सदस्यांनी सरपंच अनिता पाटील यांच्या वरती अविश्वास ठराव दाखल केला होता. आज त्यासाठी प्रशासनाने विशेष ग्रामसभा बोलावून गुप्त पद्धतीने मतदान घेतले. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत २१०४ मतदानापैकी १६१४ मतदान नोंदवले गेले.

नोंदवलेल्या १६१४ मतापैकी प्रत्यक्षात१५९९ मते झाली असून अविश्वास ठरावाच्या बाजूने ९३२तर ठरावाच्या विरोधात ५९० मते झाली . तर ७७ मते अवैद्य ठरली. त्यामुळे सरपंच अनिता सचिन पाटील यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव ३४२ मतानी संमत करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन पंचायत समिती राधानगरीचे गट विकास अधिकारी डॉ . संदिप भंडारे यांनी काम पाहिले.
 

Web Title: No-confidence motion against Kote Sarpanch approved, 932 votes in favor of the resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.