उमगाव सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:40+5:302021-03-16T04:25:40+5:30

उमगाव (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच गणपती कृष्णा सुतार यांच्याविरोधात दाखल झालेला ठराव आठ विरुद्ध एक मताने मंजूर ...

No-confidence motion passed on Umgaon Sarpanch | उमगाव सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

उमगाव सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

Next

उमगाव (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच गणपती कृष्णा सुतार यांच्याविरोधात दाखल झालेला ठराव आठ विरुद्ध एक मताने मंजूर झाला. तहसीलदार विनोद रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.

सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, अवास्तव खर्च करणे, खर्चाचा हिशेब न देणे, आपल्या मर्जीप्रमाणे प्रोसेडिंग लिहिणे, स्वत:च्या मुलाला कामगार बनवणे असे आरोप उपसरपंच रुक्माण्णा गावडे, महेश गावडे, लक्ष्मण गावडे, दत्तात्रय सुतार, सुप्रिया गावडे, लक्ष्मी गावडे, अपूर्वा पेडणेकर, रंजना कांबळे आदी सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार सोमवार (१५) उमगांव ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दुपारी १२ वाजता विशेष सभा घेण्यात आली.

यावेळी आठ सदस्यांनी हात उंचावून सरपंच सुतार यांच्या विरोधात मतदान केल्याने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी पार्वती देवळी या महिला सदस्या तटस्थ राहिल्या.

Web Title: No-confidence motion passed on Umgaon Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.