महामंडळाच्या कोणत्याही संचालकाने साखर चोरलेली नाही-मेघराज राजेभोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:00 PM2020-10-31T12:00:07+5:302020-10-31T12:02:01+5:30
Chirtpatmahamandal, suger, dircator, kohapurnews महामंडळाच्या कोणत्याही संचालकाने साखर चोरलेली नाही, पॅकिंग बदलण्यासाठी ही पोती नेण्यात आली होती. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : महामंडळाच्या कोणत्याही संचालकाने साखर चोरलेली नाही, पॅकिंग बदलण्यासाठी ही पोती नेण्यात आली होती. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी स्पष्ट केले.
धनादेशाचे प्रकरण मुरले नाही म्हणून अर्जुन नलवडे यांना गोवण्यासाठी धनाजी यमकर यांनीच हा डाव केला आहे. पोलीस तपासात काहीही निष्पन्न झालेले नाही. माझ्या आमदारकीचा विषय अंतिम टप्प्यात असताना केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विजय पाटकर यांनी माझी बदनामी करण्यासाठी धनाजीला पुढे केले आहे.
आम्ही महामंडळासाठी काय केले हे सभासदांना माहीत आहे त्यामुळे निवडणुकीतही आम्ही त्याच ताकदीने निवडून येऊ, असे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी स्पष्ट केले. संचालक रवी गावडे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांचा फोन नेटवर्कमध्ये नव्हता.
राज्यभर आंदोलन करू : विजय पाटकर
माजी अध्यक्ष विजय पाटकर म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात चित्रपट व्यावसायिकांच्या विकासासाठीचा एकही ठोस निर्णय अध्यक्षांनी घेतलेला नाही. कार्यकारिणीची बैठक घेतली नाही. चित्रपट महामंडळाच्या इतिहासात असले खालच्या पातळीवर जावून केलेले राजकारण, चोरी यामुळे मंडळाच्या नावलौकिकाला बट्टा लागला आहे. घटनेनुसार संंबंधितांवर १५ दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही मुंबईसह राज्यभर आंदोलन करून दबाव आणू, पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू.