कोल्हापूर जिल्ह्यात बिल नाही तर वीज नाही ‘महावितरण’चा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:17 AM2017-11-08T01:17:08+5:302017-11-08T01:24:15+5:30
कोल्हापूर : मार्च महिन्यात एक कोटी ३४ लाखांवर आलेली थकबाकी सात महिन्यांत साडेबारा कोटींवर पोहोचल्याने महावितरण वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर : मार्च महिन्यात एक कोटी ३४ लाखांवर आलेली थकबाकी सात महिन्यांत साडेबारा कोटींवर पोहोचल्याने महावितरण वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो कर्मचाºयांनी विद्युत भवन येथे एकत्र येऊन १५ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीतले साडेबारा कोटी रुपये वसूल करण्याचा निर्धार केला व ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश थकबाकीदारांना दिला.
मार्च २०१७ अखेर कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वर्गवारीतले २३ हजार ३७० ग्राहक थकबाकीत होते. त्यांच्याकडे १ कोटी ३४ लाख इतकी बाकी होती. मात्र, सात महिन्यांत थकबाकी व थकबाकीदार ग्राहकांची संख्या वाढली आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतले १ लाख ७५ हजार ३७९ ग्राहकांकडे १२ कोटी ५१ लाख ३३ हजार रुपये थकबाकी आहे. वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या आदेशानुसार कर्मचाºयांना एकत्र करून त्यांचे मनोधैर्य उंचावून थकबाकी वसुलीचा निर्धार करण्यात येत आहे.
अधिकारी-कर्मचाºयांची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. मंगळवारी मुख्य अभियंता किशोर परदेशी व अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांनी कर्मचाºयांना वसुलीसाठी मार्गदर्शन केले. वसुली करताना कोणाचीही गय होणार नाही. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांचे कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले.