माहेश्वरी पार्कमध्ये ना गटारी ना रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:50+5:302021-05-29T04:19:50+5:30
फुलेवाडी : नागदेवाडी (ता.करवीर) गावाच्या हद्दीत येणाऱ्या माहेश्वरी पार्कमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून प्राथमिक सुविधांंची वानवा आहे. फुलेवाडी रिंगरोड ...
फुलेवाडी : नागदेवाडी (ता.करवीर) गावाच्या हद्दीत येणाऱ्या माहेश्वरी पार्कमध्ये गेल्या कित्येक
वर्षांपासून प्राथमिक सुविधांंची वानवा आहे. फुलेवाडी रिंगरोड लगत
असणाऱ्या या कॉलनीमध्ये ना गटारी ना रस्ता आहे. शिवाय पाणीपुरवठाही अनियमित होत आहे. गटारी नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असते. तर डांबरी रस्ता
नसल्याने वाहनधारकांची कसरत नित्याचीच आहे.
माहेश्वरी कॉलनीच्या स्थापनेपासून येथे फक्त कच्च्या रस्त्याच झाला आहे. काही गल्ल्यामध्ये खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. खाचखळग्यातून मार्ग काढताना वाहनधारकासह नागरिकांना रोजच कसरत करावी लागत
आहे. येथे डांबरी रस्ता कधी होणार याकडे कॉलनीधारकांचे लक्ष लागले आहे. कॉलनीमध्ये स्थापनेपासून गटारींचा ठावठिकाणा नाही, काही घरांच्यासमोर
मालकांनी स्वतः गटारी बनवल्या आहे., तर काही ठिकाणी पाणी साचून राहते. काही गल्ल्यांमध्ये रस्त्यावर पाणी वाहताना दिसून येत आहे. गटारी उघड्यावर असल्याने
डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
माहेश्वरी कॉलनीत दैनंदिन पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. या भागात दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यातही कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक वैतागले आहेत.
फोटो ओळ : 1 ) माहेश्वरी कॉलनीत उघड्यावरील गटारी
2) चावी, गटारीचे पाणी रस्त्यामधूनच जात असल्याने खराब झालेला रस्ता ( छाया : सागर चरापले)