गरिबांसाठी पॅकेज जाहीर झाल्याशिवाय लॉकडाऊन नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:21+5:302021-04-11T04:24:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन जाहीर ...

No lockdown until the package for the poor is announced | गरिबांसाठी पॅकेज जाहीर झाल्याशिवाय लॉकडाऊन नको

गरिबांसाठी पॅकेज जाहीर झाल्याशिवाय लॉकडाऊन नको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन जाहीर करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे; परंतु गरिबांना मदतीचे पॅकेज जाहीर केल्याशिवाय लॉकडाऊन जाहीर नको, अशी आमची भूमिका असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कुणी-कुणी चुकीच्या पद्धतीने लस घेतली याची चौकशी केली तर अनेकजण बिळात बसतील असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्यानंतर पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणताना नागरिकांचा जीव जाणार नाही हेदेखील पाहावे लागेल. १४ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावा म्हणायला डॉ. तात्याराव लहाने यांचे काय जातेय? त्यांनी झोपडपट्टीत जाऊन जरा परिस्थिती पाहावी. सर्वसामान्यांना शासन घरी शिवभोजन थाळी पाठविणार आहे का? एकीकडे पैसे नाही म्हणतात, तर मग आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपये का? दिले? ते दिले? नसते तर ७०० कोटी रुपये उपलब्ध झाले असते. मुंबईमधील नगरसेवकांना सुशोभीकरणासाठी आदित्य ठाकरे यांच्या सहीने तीन हजार कोटी रुपये देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. मग गरिबांच्या पॅकेजसाठी पैसे नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लवकरच तिसऱ्या मंत्र्याची विकेट पडणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

चौकट

गोकुळला भाजपची जी भूमिका तीच घाटगेंची

कागलमध्ये समरजित घाटगे यांचे ठराव आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी मेळावा बोलावला असला तरी त्यांत चुकीचे काहीच नाही. परंतु भाजपने महादेवराव महाडिक यांच्या सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला आहे. आमचे जिल्ह्यात ८०० ठराव आहेत. त्यामुळे आम्हांला समाधानकारक जागा मिळाल्या पाहिजेत. जी भूमिका भाजपची तीच समरजित यांची आहे. सत्तारूढांच्या विजयासाठी भाजपचे कार्यकर्ते परिश्रम करतील. देवस्थान समिती बरखास्त करणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: No lockdown until the package for the poor is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.